khawaja asif sakal
ग्लोबल

Imran Khan Party : इम्रान यांच्या पक्षावर बंदीची शक्यता; संरक्षणमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके इन्साफ’ (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून सुरू आहे.

पीटीआय

इस्लामाबाद - माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके इन्साफ’ (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून सुरू आहे. खुद्द संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच आज तसा अधिकृत खुलासा केला. इम्रान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी लष्करी तळे आणि बड्या अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले केल्याने तणाव निर्माण झाला होता. याची लष्कराने गंभीर दखल घेतली आहे.

पाकिस्तानी रेंजर्संनी नऊ मे रोजी इमरान यांना अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. इम्रान समर्थकांनी लष्करी कार्यालये आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर हल्ले केले होते. लाहोरच्या कोअर कमांडरचे घर, मियाँवाली हवाई तळ आणि फैसलाबादमधील आयएसआयच्या इमारतीवर देखील हल्ले करण्यात आले होते.

रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावर प्रथमच जमावाकडून हल्ला झाला होता. या हिंसाचारामध्ये दहाजणांचा मृत्यू झाला होता. इम्रान यांनी अद्याप त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केलेला नाही त्यामुळे त्यांच्या पक्षावर बंदी घालण्याचा विचार सरकार दरबारी गांभीर्याने सुरू आहे, असे ख्वाजा यांनी स्पष्ट केले.

आमच्या पक्षावर बंदी घातली तर आम्ही याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ. अगदी १९६० मध्ये जमात-ए- इस्लामी या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णयसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता.

- बॅ. अली जाफर, ‘पीटीआय’चे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT