Iron Beam Technology Sakal
ग्लोबल

इस्त्राइलकडून Iron Beam लेझर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; पाहा व्हिडीओ

ही जगातील पहिली उर्जा आधारित प्रणाली असून यामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्र पाडण्यासाठी 'लेझर'चा वापर करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जेरूसलेम : इस्त्राइलने जगातील पहिल्या क्षेपणास्त्र विरोधी लेजर सिस्टिमची यशस्वी चाचणी केली असून याबाबतची माहिती इस्त्राइलचे पंतप्रधान नफ्ताली बॅनेट यांनी ट्वीट करत दिली आहे. या सिस्टिमला 'आयर्न बीम लेझर इंस्पेक्शन' असं नाव देण्यात आलं असून यामुळे शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा अचूक शोध घेऊन मारा करता येऊ शकतो.

ही जगातील पहिली उर्जा आधारित प्रणाली असून यामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्र पाडण्यासाठी 'लेझर'चा वापर करण्यात येत आहे. यासंदर्भातील चाचणीचा व्हिडीओ पंतप्रधान नफ्ताली बॅनेट यांनी शेअर केला आहे. यामध्ये हे यंत्र क्षेपणास्त्र आणि रॉकेटवर अचूक मारा करत पाडत असल्याचं दिसत आहे. इस्त्राइलच्या संरक्षण संशोधन आणि विकास संचालनालयाने आयर्न बीम लेजर इंटरसेप्शन या सिस्टिमचा वापर करत या यंत्राची यशस्वी चाचणी केली आहे.

"आपल्याला ही गोष्ट ऐकायला सायन्स फिक्शन असल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे." असं इस्त्राइलच्या पंतप्रधानांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलंय. यातील एका शॉटसाठी (एकावेळी केला गेलेला मारा) फक्त ३.५० डॉलर इतका खर्च येतो. असंही त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ या तंत्रज्ञानाला गेम चेंजर असल्याचं सांगत आहेत. तसेच या यंत्रणेला हाताळणं खूप सोपं असून मागच्या काही वर्षापासून या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रयत्न केले जात होते. राफेल हत्यार बनवणाऱ्या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या साथीने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

दरम्यान हे यंत्र कमी प्रकाशात यशस्वी काम करत नसल्याचं सांगितलंय. ढगाळ आणि खराब वातावरणात या यंत्रणेला हाताळता येत नाही. दरम्यान या यंत्रणेला लढाऊ विमानावर बसवण्याची तयारी चालू आहे. जेणेकरुन ढगांच्या वरुन सीमेवर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी सध्या प्रयत्न केले जात असल्याचं इस्त्राइलच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT