ग्लोबल

तुम्ही इस्रायलमध्ये सर्वात लोकप्रिय, माझ्या पक्षात या! मोदींना निमंत्रण

ओमकार वाबळे

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बेठक झाली. ग्लोसगो या ठिकाणी सुरू असलेल्या सीओपी-26 या हवामान बदलाच्या शिखर परिषदेला दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नफ्ताली यांनी मोदींचे कौतुक केले. तुम्ही इस्रायलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहात, असे ते म्हणाले. यावेळी नफ्ताली यांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये हशा पिकला. हवामान बदलाच्या महत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठकीदरम्यान हा संवाद झाला.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या संवादाच्या व्हिडिओमध्ये इस्रायलचे पंतप्रधान पीएम मोदींशी बोलताना, "तुम्ही इस्रायलमधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहात. या आणि माझ्या पक्षात सामील व्हा", असं असं म्हणाले. यामुळे उपस्थित सर्व अधिकारीही हसू लागले. हे कौतुक ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरता आले नाही.

इस्रायलच्या निवडणुकीतील बेंजामिन नेतन्याहू यांचा ऐतिहासिक पराभव झाल्यानंतर जून महिन्यात इस्रायलच्या पंतप्रधानपदी नफ्ताली विराजमान झाले. यानंतर पंतप्रधान बेनेट आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच औपचारिक बैठक होती. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार पंतप्रधान मोदी इस्रायली अधिकारी आणि मंत्र्यासोबत उच्च-तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

Latest Marathi News Live Update: महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा होणार भव्य कायापालट; केबल-स्टेड ब्रिज, बोगदे आणि 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

SCROLL FOR NEXT