Israel Defence Missile Test
Israel Defence Missile Test  esakal
ग्लोबल

इस्राईलने घेतली एरो-३ मिसाईलची यशस्वी चाचणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : इराणबरोबर (Iran) वाढत्या तणावादरम्यान इस्त्राईलने एरो-३ मिसाईलची यशस्वीरित्या चाचणी केली आहे. ही माहिती इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्री आणि इस्राईल (Israel) एअरफोर्सने संयुक्तपणे एरो-३ मिसाईल डिफेन्स सिस्टिमची चाचणी मध्य इस्रायलमध्ये घेण्यात आली आहे. चाचणी दरम्यान एरो सिस्टिमने रडार एरोने लक्ष्य शोधून काढले आणि डेटाचे बॅटल मॅनेजमेंट कंट्रोलला ट्रान्सफर केले. जेथे डेटाचे अॅनॅलिसेस केले गेले. त्यानंतर एक संरक्षण आराखडा तयार केला गेला आणि लक्ष्याच्या दिशेने दोन एरो-३ इंटरसेप्टर प्रक्षेपित केले. लक्ष्याला यशस्वीरित्या नष्ट केले. (Israel Successfully Test Arrow 3 Missile)

एरो-३ सिस्टिममध्ये इंटरसेप्टिंग क्षमता

इस्राईली संरक्षण मंत्रालयाने हे परीक्षण इस्रायलसाठी महत्त्वाचे सांगितले. मंत्रालयाने सांगितले, की सध्या आणि भविष्यातील धोके पाहता इस्रायलचा हा मैलाचा दगड ठरणार आहे. हे यश देशातील सैन्याची अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या कार्यक्रमाचा भाग आहे. एरो-३ सिस्टिमची नवीन मालिकेतील मिसाईलमध्ये जास्त उंचावर आणि जमिनीपासून खूप दूर इंटरसेप्टिंग क्षमता आहे.

एरो-३ सिस्टिमचे अनेक परीक्षण झाले आहे

एरो-३ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम इस्रायल आणि अमेरिकेचे (America) संयुक्त कार्यक्रम आहे. त्याला अमेरिकन मिसाईल संरक्षण एजन्सी आणि आयएमडीओद्वारा संचालित केले जात होते. एरो-३ सिस्टिमच्या अनेक चाचण्या झाल्या आहेत. शेवटची चाचणी २०१९ मध्ये अलास्कामध्ये झाली होती. जेथे १० दिवसांदरम्यान तीन यशस्वी इंटरसेप्शन पाहिले गेले होते. हे प्रथम घडले होते, की अशा प्रकारची चाचणी इस्राईल बाहेर झाले होते. या चाचणीनंतर एरोच्या क्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण विस्तार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT