Italy first women PM Georgia Maloney
Italy first women PM Georgia Maloney 
ग्लोबल

इटलीला मिळणार पहिल्या महिला पंतप्रधान

सकाळ वृत्तसेवा

रोम : इटलीत रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलॉनी यांनी बहुमत मिळाल्याचा दावा केला आहे. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहे. हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीनंतर इटलीत पुन्हा एकदा कडव्या उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर येणार आहे.

‘‘हा प्रारंभ आहे आणि आमची उद्या आमचे कर्तृत्व आम्ही सिद्ध करू,’’ असा विश्‍वास मेलॉनी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सोमवारी व्यक्त केला. जॉर्जिया मेलॉनी (वय ४५) या मुसोलिनीच्या समर्थक आहेत आणि सार्वजनिक व्यासपीठावरून बोलताना त्यांनी अनेक वेळा त्याची प्रशंसा केलेली आहे. मतमोजणीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला काल मागे टाकल्यानंतर मेलॉनी म्‍हणाल्या होत्या, की ही रात्र आमच्यासाठी अभिमानाची आणि पापापासून मुक्त करणारी रात्र आहे.

इटलीतील सार्वजनिक प्रसारमाध्यम ‘आरएआय’ने दिलेल्या माहितीनुसार मेलॉनी यांच्या पक्षाने केलेल्या आघाडीला ४३ टक्के मत मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मेटिओ साल्व्हिनी यांचा ‘द लिग’ आणि सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांच्या ‘फ्रोझा इटालिया या पक्षांचा त्यांच्या आघाडीत समावेश आहे. इटलीच्या सिनेटमध्ये बहुमतासाठी १०४ मते मिळविणे आवश्‍यक असते. मेलॉनी यांच्या गटाला किमान ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

निर्वासितांना विरोध

मेलॉनी यांचा पक्ष निर्वासितांच्या विरोधात आहे. त्या पंतप्रधान झाल्या तर इटली युरोपीय समुदायातून (ईयू) बाहेर पडण्याची शक्यता आहे. ‘ईयू’च्या धोरणे त्यांना मान्य नाहीत. युरोपीय समुदायामुळे निर्वासितांची समस्या निर्माण झाल्याचा दावा त्या करतात. इटलीत निर्वासितांच्या लोकसंख्या हा त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. ‘ईयू’ने इटलीची वांशिकता बदलला, असा मेलॉनी यांचा आरोप आहे. निर्वासित विशेष करून मुस्लिम निर्वासित हे धोकादायक आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT