ग्लोबल

जॅक डोर्सी पायउतार; पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ

सकाळ डिजिटल टीम

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी हे आता आपल्या पदावरुन पायउतार झाले आहेत. पराग अग्रवाल हे आता नवे सीईओ असणार आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की, कंपनीत सह-संस्थापक, सीईओ ते अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष ते अंतरिम-सीईओ ते सीईओ अशा भूमिका पार पाडल्यानंतर मी आता ठरवलंय की आता थांबण्याची वेळ आली आहे. पराग अग्रवाल हे आता आमचे सीईओ होणार आहेत.

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. आपलं पद सोडताना त्यांनी ट्विटरचे पुढचे सीईओ पराग अग्रवाल असतील, असं सांगितलंय. संपूर्ण बोर्डाने त्यांना एकमताने पुढील सीईओ म्हणून निवडल्याचंही त्यांनी सांगितलंय. डॉर्सी यांनी 2006 मध्ये ट्विटरच्या स्थापनेमध्ये मदत केली होती. 2008 पर्यंत त्यांनी सीईओ म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते या पदावरुन पायउतार झाले होते. मात्र, तत्कालीन सीईओ डिक कोस्टोलो यांनी पद सोडल्यानंतर ते पुन्हा सीईओ म्हणून रुजू झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT