Israel Hamas War News 
ग्लोबल

गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करत ज्यू कार्यकर्त्यांचा थेट अमेरिकन संसदेत प्रवेश; पोलिसांनी घेतले ताब्यात

Sandip Kapde

Israel Hamas War News: इस्राइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काल (बुधवार) तेल अवीव येथे पोहोचले. येथे त्यांनी इस्राइलची बाजू समजून घेतली. गाझाच्या हॉस्पिटलवर रॉकेट लाँचर पडल्यामुळे ५०० लोकांचा मृत्यू झाला त्यात इस्राइलचा काहीही सहभाग नसल्याचे देखील जो बायडेन यांनी काल स्पष्ट केले.

दरम्यान, इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद जगातील अनेक देशांबरोबरच अमेरिकेतही उमटत आहेत. पुरोगामी ज्यू-अमेरिकन कार्यकर्त्यांनी वॉशिंग्टनमधील अमेरिकन कॅपिटलमध्ये प्रवेश केला आणि धरणे आंदोलन केले. त्यांनी अमेरिकन काँग्रेसला गाझामध्ये युद्धविराम करण्याचे आवाहन केले. या युद्धात आतापर्यंत सुमारे पाच हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Global News)

व्हाईट हाऊसजवळही ज्यू संघटनांनी असेच आंदोलन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वॉशिंग्टन येथील निवासस्थानाबाहेर बुधवारी शेकडो निदर्शक जमले आणि त्यांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. गाझामध्ये काँग्रेसने युद्धविरामासाठी पुढाकार घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. हजारो अमेरिकन ज्यूंनी संसदेच्या बाहेर निषेध केला, तर ३५० हून अधिक आत होते.

"आम्हाला अटक केली जात आहे, परंतु जोपर्यंत आम्हाला युद्धविराम आणि गाझामधील पॅलेस्टिनींचा नरसंहार थांबवण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही," असे ज्यू संघटनेने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Latest Marathi News)

"आंदोलकांच्या एका गटाने संसदेत प्रवेश केला होता. गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करणाऱ्या या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अमेरिकन कॅपिटलमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली. रस्ते बंद करण्याचे काम सुरू आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे," अशी माहिती अमेरिकन कॅपिटल हिल पोलिसांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT