IND vs ZIM Super 8 match
esakal
T20 WC IND vs ZIM Marathi Cricket News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहायचं असेल, तर भारतीय संघासमोर 'विजय' हा एकच पर्याय उरला आहे. चेन्नईच्या चेपॉकवर त्यांचा झिम्बाब्वेशी सामना होतोय. सिकंदर रझाचा हा संघ ऑस्ट्रेलिया व श्रीलंका या तगड्या संघांना पराभूत करून सुपर ८मध्ये पोहोचला आहे आणि त्याला हलक्यात घेण्याची चूक भारताला महागात पडू शकते. उभय संघ २०२२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते आणि भारताने ती मॅच ७१ धावांनी जिंकली होती. वर्ल्ड कपमधील झिम्बाब्वेविरुद्धची भारताची ती एकमेव मॅच होती.