John Kirby sakal
ग्लोबल

John Kirby : भारतातील लोकशाही सर्वांत चैतन्यशील

‘‘भारतापेक्षा चैतन्यदायी लोकशाही असलेले देश जगात खूप कमी आहेत, असे सांगत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या भारतीयांची प्रशंसा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा संवाद सल्लागार जॉन किर्बे यांनी शुक्रवारी (ता. १७) केली.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘‘भारतापेक्षा चैतन्यदायी लोकशाही असलेले देश जगात खूप कमी आहेत, असे सांगत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या भारतीयांची प्रशंसा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा संवाद सल्लागार जॉन किर्बे यांनी शुक्रवारी (ता. १७) केली. भारतात सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. दोन हजार ६६० नोंदणीकृत पक्षांकडून हजारो उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण ५४५ खासदार निवडून देण्यासाठी ९६ कोटी ९० लाख मतदार दहा लाख मतदान केद्रांवर मतदानाचा हक्क बजावत आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना किर्बे यांनी भारतीय लोकशाहीचा प्रशंसा केली.

‘‘जगात भारतापेक्षा जास्त चैतन्यशील लोकशाही देश फारसे नाही. आम्ही भारतीय लोकांचे त्यांच्या मतदानाची क्षमता आणि आणि भावी सरकार निवडण्यात त्यांचा सहभाग याचे आम्ही कौतुक करतो,’’ असे ते म्हणाले.

दुसऱ्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना किर्बे म्हणाले की, बायडेन प्रशासनाच्या गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारताशी आमचे संबंध अत्यंत जवळचे आहेत आणि ते सातत्याने आणखी मजबूत होत आहेत.

गेल्या जूनमधील अधिकृत भेटीत हे तुम्हाला दिसलेच असेल. आम्ही सर्व प्रकारचे नवीन उपक्रम सुरू केले. जटिल अशा नवतंत्रज्ञानावर एकत्रितपणे काम करीत आहोत. भारत ज्याचा एक भाग आहे, अशा आशिया-प्रशांत गटाचा विस्तार आणि त्याचे महत्त्व वाढविण्यावर भर देत आहोत. दोन्ही देशांच्या नागरिकांमधील देवाणघेवाण आणि सामाईक लष्करी मदतही महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

विदेशी नागरिकांचा द्वेष

भारत आणि जपान हे विदेशी नागरिकांचा द्वेष करणारे देश आहेत, असे अध्यक्ष बायडेन यांना वाटते का?, या प्रश्‍नावर किर्बे यांनी नाही, असे उत्तर दिले आणि म्हणाले की, बायडेन यांनी यासंबंधी जे वक्तव्य केले त्यामागे व्यापक विचार होता. अमेरिकेतील आमच्या गतिमान लोकशाही, तिची सर्वसमावेशकता आणि त्यातील सहभाग याविषयी ते व्यापक पातळीवर बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT