तालिबान
तालिबान  sakal
ग्लोबल

काबूल : महिला व्हॉलिबॉलपटूचे तालिबानकडून शिरकाण

सकाळ वृत्तसेवा

काबूल : दोन महिन्यापूर्वी अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानने एका महिला व्हॉलिबॉलपटूची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले आहे. मेहजबीन हकीमी असे मृत खेळाडूचे नाव आहे. हजारा समुदायातील असल्याने तिची हत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. तालिबानला या अल्पसंख्याक समुदायविरुद्ध द्वेष असल्याचे सांगितले जाते.

अफगाणिस्तानच्या ज्युनिअर व्हॉलिबॉल संघाच्या प्रशिक्षकाने सोशल मीडियावर महिला खेळाडूच्या हत्येची माहिती दिली. ही घटना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याची खबर काल लागली. मेहजबीनच्या हत्येबाबत तिच्या कुटुंबीयांनी तालिबानच्या दहशतीपोटी कोणालाही माहिती दिली नाही. त्यांना तोंड बंद ठेवण्याचे तालिबानने धमकावले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार मेहजबीन ही चांगली व्हॉलिबॉलपटू होती. अन्य क्रीडा प्रकारातही तिने कौशल्य मिळवले होते. अश्रफ घनी यांच्या कार्यकाळात ती क्लबमध्ये जायची. सोशल मीडियावर तिच्या हत्येनंतरचे फोटो व्हायरल झाले आहेत. परंतु ते घृणास्पद आहेत. प्रशिक्षकाच्या मते, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर काही खेळाडू देशाबाहेर गेले. परंतु अनेक जण देशातच राहिले. हकीमीच्या हत्येमागे हजारा समुदाय कारण असू शकते. तालिबानमध्ये बहुतांश सुन्नी असून ते हजारा समुदायाला मुस्लिम मानत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT