Dinosaur Eggs esakal
ग्लोबल

डायनासोर पृथ्वीवर पुन्हा 'राज्य' करणार? अर्जेंटिनात सापडली 100 अंडी

सकाळ डिजिटल टीम

एक असाच लघुग्रह मॅक्सिकोजवळ धडकल्याने पृथ्वीवरील डायनासोर नामशेष झाले आहेत.

अर्जेंटिना : एक असाच लघुग्रह मॅक्सिकोजवळ धडकल्याने पृथ्वीवरील डायनासोर नामशेष झाले आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या या धडकेच्या वेळी पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते. आता त्यांचे केवळ नावच शिल्लक राहिले आहे. आता अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशात 100 हून अधिक डायनासोरची अंडी सापडली आहेत. अर्जेंटिनातील डायनासोरच्या स्मशानभूमीत ही प्राचीन अंडी सापडली. ह्या अंड्यांमुळं आता जगात प्रथमच डायनासोरच्या कळपाविषयी माहिती उघड होणार आहे.

या अंड्यांच्या स्कॅनिंगनंतर ही सर्व डायनासोरच्या एकाच प्रजातीचे असल्याचे आढळून आलेय. या प्रजातीचं नाव Mussaurus patagonicus असं होतं. हे लांब मानेचे डायनासोर शाकाहारी होते. या डायनासोरचे घरटे 19.30 दशलक्ष वर्षे जुने असून त्यात 100 हून अधिक अंडी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अंड्यांच्या मदतीनं आता जीवाश्मशास्त्रज्ञांना सुरुवातीच्या डायनासोरच्या प्रजातींची माहिती मिळू शकणार आहे.

80 सांगाड्यांसह 100 पेक्षा अधिक अंडी सापडली

ही कोंबडीच्या आकाराची अंडी 8 ते 30 च्या गटातील आहेत, ज्यावरून असं सूचित होतं की ते घरट्यांमध्ये राहत होते. हे त्यांच्या पिलांचं सामान्य ठिकाण होतं. शास्त्रज्ञांना डायनासोरचे सांगाडेही सापडले आहेत. या सर्व पुराव्यावरुन स्पष्ट होतं की, डायनासोर कळपांमध्ये राहत होतं. संशोधक डिआगो पोल म्हणाले, मी या ठिकाणी डायनासोरचे सांगाडे शोधण्यासाठी गेलो होतो. आम्हाला तिथं 80 सांगाडे आणि 100 पेक्षा जास्त अंडी सापडली आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT