Imran Khan esakal
ग्लोबल

Pakistan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांकडून भारताचं पुन्हा कौतुक; इम्रान म्हणाले, आम्हालाही भारताप्रमाणं..

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं (India Foreign Policy) कौतुक केलंय.

बाळकृष्ण मधाळे

यापूर्वी मे 2022 मध्ये इम्रान खान यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं (India Foreign Policy) कौतुक केलंय.

भारताप्रमाणंच (India) इस्लामाबादलाही रशियाकडून स्वस्तात कच्चं तेल (Russia Oil) मिळवायचं होतं, पण आमचं सरकार कोसळल्यामुळं आम्ही ते करू शकलो नाही, असं ते म्हणाले.

'दुर्दैवानं माझं सरकार कोसळलं'

राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुख म्हणाले, 'भारताप्रमाणं आम्हालाही रशियाकडून स्वस्तात कच्चं तेल मिळवायचं होतं, पण ते होऊ शकलं नाही. कारण, दुर्दैवानं अविश्वास प्रस्तावामुळं माझं सरकार कोसळलं.'

पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर इम्रान खान म्हणाले, 'आमचा देश सवलतीच्या दरात रशियाकडून कच्चं तेल खरेदी करू शकतो. रशिया युक्रेन युद्धाच्या परिस्थितीतही भारताला तेल देत आहे.' दरम्यान, यापूर्वी मे 2022 मध्ये इम्रान खान यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT