jeff bezos 
ग्लोबल

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीशी घटस्फोटानंतर महिलेने शिक्षकाशी केलं लग्न

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- जगातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सिएटलमधील एका शिक्षकासोबत लग्न केले आहे. एक खासगी शाळेत शिक्षक असलेल्या डान जेवेट यांच्यासोबत त्यांनी लग्नगाठ बांधली. चॅरिटीसंबंधात असणाऱ्या एका वेबसाईटवरुन डान जेवेट यांनी याची माहिती दिली. ही वेबसाईट बिल गेट्स, मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांनी दान द्यावं यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बनवण्यात आली आहे. वेबसाईटवर मॅकेजी स्कॉट यांच्या एका पोस्टवर टिप्पणी करताना डान जेवेट यांनी लिहिलंय की, एका अद्भूत योगायोगामुळे मी जगातील एका सर्वात दयाळू महिलेशी लग्न केले आहे. त्यांनी एका कमिटमेंटला जॉईल केलं आहे, त्या आपली संपत्ती दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापरतील.  

जेवेट यांनी एका पत्रात म्हटलंय की, मी आपल्या जीवनाचा एक मोठा भाग शिक्षक म्हणून घालवला आहे, पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी चॅरिटी करुन शकेन. ब्लुमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार मॅकेंजी स्कॉट या जगातील २२ व्या श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ५३.५ अब्ज डॉलर आहे. यातील मोठा हिस्सा जेफ बेजोस यांनी दिलेल्या घटस्फोटामुळे आलेला आहे. जेफ बेजोस यांना २०१९ मध्ये घटस्फोट दिल्यानंतर जगातील सर्वाधिक चॅरिटी करणाऱ्यांपैकी त्या एक ठरल्या होत्या. गेल्या वर्षी मॅकेंजी स्कॉट यांनी ६ अब्ज डॉलरची रक्कम दान केली होती. 

एका वर्षातील कोणत्याही व्यक्तीने केलेले हे सर्वात मोठे दान आहे. मॅकेंजी स्कॉट या मोठ्या प्रमाणात अश्वेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान देतात. मागील वर्षी मॅकेंजी स्कॉट यांनी त्यांच्या टीमला सांगितलं होतं की, लवकरात लवकर कशा पद्धतीने दान करता येईल याबाबत सूचना द्या.

वॉल स्ट्रिट जर्नलकडून मॅकेंजी यांच्या लग्नाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आपल्या वक्त्यव्यात म्हटलंय की, डान एक चांगले व्यक्ती आहेत. मी त्यांच्या दोघांसाठी खूप खूष आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस १७६.६ कोटींच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP and Panchayat Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च मर्यादा किती असणार? निवडणूक आयोगाने केलं जाहीर

१०० कोटींची गुंतवणूक आणि सुनील शेट्टीचं सूत्रसंचालन; 'भारत के सुपर फाउंडर्स'चा ट्रेलर लाँच; कुठे पाहाल शो?

ZP Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर; 'या' तारखेला मतदान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

BBM6: सागर कारंडे कोण? तन्वी कोलतेने तोडले अकलेचे तारे; मग नेटकऱ्यांनीही काढलं वाभाडं; म्हणाले-, 'अरे ही बाई...'

Latest Marathi News Live Update : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात अविनाश जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, उद्या सुनावणी

SCROLL FOR NEXT