representational image
representational image 
ग्लोबल

भारतातून आंतरराष्ट्रीय स्थलांतर सर्वाधिक; पावणेदोन कोटी भारतीय विदेशांत वास्तव्यास 

पीटीआय

न्यूयॉर्क : विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एक कोटी 70 लाख भारतीय विदेशांत वास्तव्यास असून, यातील 50 लाख नागरिक आखाती देशांमध्ये राहतात. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) नवीन अहवालात प्रसिद्ध केली आहे. 

भारताखालोखाल मेक्‍सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान आणि युक्रेनमधील नागरिकही मोठ्या प्रमाणात विदेशात स्थलांतरित झाले आहेत. याची संख्या 60 लाख ते एक कोटी 10 लाख एवढी असल्याचे यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. या वर्षी भारतातील आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या एक कोटी 70 लाख एवढी आहे. त्यानंतर मोक्‍सिकोचा क्रमांक आहे. तेथे ही संख्या एक कोटी 30 लाख आहे. रशियातून एक कोटी 10 लाख, चीनचे एक कोटी, बांगलादेशातील 70 लाख, सीरियातून 70 लाख पाकिस्तानमधून 60 लाख नागरिकांनी देशांतर केले आहे. 

भारतातील स्थलांतरित झालेले नागरिक विविध देशांत वास्तव्यास आहेत. त्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये 30 लाख, अमेरिका व सौदी अरेबियात प्रत्येकी 20 लाख भारतीय राहात आहेत, असे अहवालात नमूद केले आहे. मातृभूमी सोडून अन्य देशांत राहणाऱ्यांच्या संख्येत 2000 पासून 49 टक्के वाढ झाली आहे. हा आकडा 25 कोटी 80 लाखांपर्यंत पोचल्याचा अंदाज आहे. 'यूएन'च्या 2030च्या शाश्‍वत विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थलांतर अडथळा ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

विश्‍वासार्ह माहिती आणि पुराव्यांअभावी देशांतरासंबंधी गैरसमजुती हटविण्यासाठी आणि स्थलांतराच्या धोरणांची माहिती देणे अवघड असल्याचे 'यूएन'च्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाचे उपसरचिटणीस लिऊ झेनमिन यांनी सांगितले. ''आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा जगभरातील नवी अंदाजित संख्या सदस्य राष्ट्रांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सुरक्षित, नियमित आणि योग्य प्रकारे होण्यासाठी त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या आहेत,'' असे ते म्हणाले. 

लोकसंख्येत वाढ अन्‌ घटही 
जगातील अनेक भागांतील लोकसंख्यावाढीत आंतराष्ट्रीय स्थलांतराचा मोठा सहभाग आहे; तर काही देशांतील किंवा भागातील ठिकाणची लोकसंख्या कमीही झाली आहे. 2000 ते 2015 या काळात उत्तर अमेरिकेतील लोकसंख्यावाढीत 42 टक्के वाटा स्थलांतरितांचा आहे. ओशियानात ही संख्या 31 टक्के आहे. स्थलांतराच्या अभावामुळे 2000 ते 2015 या वर्षांत युरोपमधील एकूण लोकसंख्येत घट झाल्याचेही दिसून येत आहे, असे मत अहवालात नोंदविले आहे. 

यंदाच्या वर्षातील स्थलांतरितांची संख्या 
एक कोटी 70 लाख 

भारत 

एक कोटी 30 लाख 
मोक्‍सिको 

एक कोटी 10 लाख 
रशिया 

एक कोटी 
चीन 

70 लाख 
बांगलादेश 

60 लाख 
पाकिस्तान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT