ग्लोबल

Donald Trump: झुकेरबर्ग यांनी मागितली माफी? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने एकच खळबळ

Facebook: कोणत्याही ‘डेमोक्रॅटिक’ला पाठिंबा देणार नसल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे ट्रम्प म्हणाले.

Chinmay Jagtap

Usa Election: ‘फेसबुक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी माझी माफी मागितली,’’ असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (ता.२) केला.

ट्रम्प यांच्यावर लादलेल्या निर्बंधासंबंधी झुकेरबर्ग यांनी ही माफी मागितली असून कोणत्याही ‘डेमोक्रॅटिक’ला पाठिंबा देणार नसल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे ट्रम्प म्हणाले.

‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, ‘‘मार्क झुकेरबर्ग यांनी मला दूरध्वनी केला. त्यांनी अनेक मला दूरध्वनी केला. एका कार्यक्रमानंतर ते माझ्याशी बोलले. मी त्या दिवशी (पेनसिलव्हेनियातील हल्ल्याची घटना) आश्‍चर्यकारक होते आणि धैर्य दाखविणारे होते. ते डेमोक्रॅटला पाठिंबा देणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मी त्या दिवशी मी जे केले त्याबद्दल माझा आदर असल्याने ते पाठिंबा देणार नाहीत, असे झुकेरबर्ग यांनी सांगितले. त्यांनी पाच वर्षांपूर्वी जे केले ते पुन्हा होणार नाही. यावर ते काम करीत असून ही समस्या आता सुटली आहे, असा विश्‍वास असल्याचे ट्रम्प म्हणाले.

गुगलवर टीका

गुगलवर टीका करताना ते म्हणाले, की गुगल वाईट आहे. अत्यंत बेफिकीर आहे. गुगल बंद होण्याच्या मार्गावर, असे मला वाटते. कारण अमेरिकी काँग्रेस हे खपवून घेणार नाही. गुगलने सावध राहायला हवे.’’ १३ जुलैला झालेल्या हल्ल्याची छायाचित्र किंवा त्यासंबंधीची माहिती गुगलवर शोधणे अवघड होते, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मात्र गुगलने त्याचे खंडन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT