Elon Musk Mark Zuckerberg Cage Fight eSakal
ग्लोबल

Cage Fight : '..भेट चौकात'; मस्क आणि झुकरबर्ग आता थेट रिंगणात भिडणार? पाहा काय आहे प्रकरण

एका ट्विटमध्ये आपण मार्कला कशा प्रकारे हरवू हेदेखील मस्कने सांगितलं आहे.

Sudesh

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि टेस्लाचे फाउंडर इलॉन मस्क हे आता थेट रिंगणात एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. कारण, इलॉन (Elon Musk) यांनी दिलेलं चॅलेंज मार्कने स्वीकारलं आहे. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात त्यांच्या या लढाईची चर्चा सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे आपल्या विनोदी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. ट्विटरवर ते कित्येक वेळा अगदी हलक्या-फुलक्या स्वरुपात चर्चा करतात. यातच आता त्यांचं एक ट्विट व्हायरल होत आहे. मार्क झुकरबर्गबद्दल (Mark Zuckerberg) सुरू असलेल्या एका चर्चेमध्ये त्यांनी "त्याची तयारी असेल तर मी त्याच्यासोबत रिंगणातील लढाईला तयार आहे" अशा आशयाचं ट्विट केलं.

झुकेरबर्गने दिलं उत्तर

मस्कच्या या ट्विवर मार्क झुकरबर्गनेही प्रतिक्रिया दिली. मार्कने मस्क यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत, "मला लोकेशन पाठव" असा मेसेजही त्यावर लिहिला होता. (Elon Musk Mark Zuckerberg Cage Fight)

Mark Zuckerberg Story Screenshot

मस्कचं पुन्हा प्रत्युत्तर

झुकेरबर्गला उत्तर देत इलॉन मस्क यांनी 'व्हेगास ऑक्टॅगॉन' ही लोकेशन सांगितली आहे. यासोबतच एका ट्विटमध्ये ते मार्कला कशा प्रकारे हरवतील हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. "माझ्याकडे एक डाव आहे, ज्याला मी 'वॉलरस' म्हणतो. यामध्ये मी माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर बसून राहतो, आणि काहीच करत नाही." अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

त्यामुळे आता खरोखरच ही लढाई होते, की यावर मार्क झुकेरबर्ग आणखी काही प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT