Iraq War Esakal
ग्लोबल

Iraq War: मध्यपूर्वेत तणाव कायम, इराण समर्थक सैनिकांनी इराकवर केला बॉम्ब हल्ला

Iraq War: इस्राइल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान मध्य इराकमधील लष्करी तळावर रात्रभर बॉम्बहल्ले करण्यात आल्याची माहिती आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Iraq War: इस्राइल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान मध्य इराकमधील लष्करी तळावर रात्रभर बॉम्बहल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. वृत्तानुसार या लष्करी तळावर लष्कराचे सैनिक आणि इराण समर्थक निमलष्करी दल राहत होते. अमेरीकेने याबाबत कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही.

इराकमधील केल्सो तळावर झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. एएफपीने गृह मंत्रालयातील सोर्स आणि लष्करी अधिकाऱ्याच्या हवाला देत म्हटले आहे की, माजी इराण समर्थक निमलष्करी गट हशेद अल-शाबी तळावर तैनात आहे.

ISIS विरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिया सशस्त्र गटांची संघटना हशद अल-शाबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्रभर झालेल्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हा आता इराकी सुरक्षा दलांचा तळ आहे.

एएफपीने मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, स्फोटामुळे उपकरणे, शस्त्रे आणि वाहने यांना मोठा फटका बसला आहे. एका अज्ञात लष्करी अधिकाऱ्याने याचे समर्थन केले की, स्फोट उपकरणे साठवणाऱ्या गोदामांमध्ये झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.

अमेरिकन सैन्याने सोशल मीडियावर म्हटले आहे की, या हल्ल्यात त्यांचे सैन्य सहभागी नव्हते. अमेरिकेने आज इराकमध्ये हवाई हल्ले केल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांची आम्हाला माहिती आहे. ते वृत्त खरे नाहीत. अमेरिकेने इराकमध्ये हवाई हल्ले केले नाहीत.

गाझातील संघर्षाच्या परिणामी युद्धाच्या उंबरठ्यावर असलेले मध्य पूर्वेचे दोन कट्टर शत्रू इराण आणि इस्राइल यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ताजा हल्ला झाला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला इस्राइलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता, ज्यात रिव्होल्युशनरी गार्ड कमांडरसह 11 जण ठार झाले होते. प्रत्युत्तर म्हणून इराणने या आठवड्याच्या सुरुवातीला इस्राइलवर मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्त्राइलने शुक्रवारी इराणच्या भूमीवर ड्रोन हल्ला केला. इराणमधील तिसरे सर्वात मोठे शहर इस्फहानजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे अनेक शहरांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Economy: IMF अहवालाचा भारताला झटका! जागतिक अर्थव्यवस्थेच्या टॉप 5 मधून बाहेर; कारण काय?

कोण आहे आलिया भट्टची मोठी बहिण शाहीनचा होणारा नवरा? एक्सने सुद्धा दिल्या शुभेच्छा, तो नक्की करतो काय?

Women Reservation Bill: नवीन आणि जुन्या महिला आरक्षण विधेयकात काय फरक? सीट रोटेशनवरून वाद का? वाचा नव्या नियमांमागचं गणित...

Gold Shortage India : एलपीजी पाठोपाठ देशात आता सोन्या-चांदीचा तुटवडा जाणवणार, दरांवर परिणाम होण्याची शक्यता; 'या'मुळे निर्माण झाले संकट

LPG Supply Update: एलपीजीवर मोठा गेमचेंजर निर्णय! रस्त्यांवरचे टँकर गायब होणार? सरकारची नवी योजना नेमकी काय आहे…?

SCROLL FOR NEXT