Modi in UN 
ग्लोबल

Modi in UN : पाकिस्तानचं नाव न घेता मोदींचा गर्भीत इशारा; म्हणाले...

अफगाणिस्तानातील परिस्थितीवरुन पाकिस्तानवर साधला निशाणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारताची बाजू मांडली. त्याचवेळी जगाला संकटकाळात सर्वांनी सोबत राहण्याचं आवाहनही केलं. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीचा उल्लेख करत पाकिस्तानचं नाव घेता गर्भीत इशारा दिला.

मोदी म्हणाले, "प्रतिगामी विचारानं जे देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत. त्यांना हे कळायला हवं की, दहशतवाद त्यांच्यासाठी देखील तितकाच मोठा धोका आहे. त्याचबरोबर आपल्याला यावर लक्ष ठेवलं पाहिजे की, अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवाद वाढवणे आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी होता कामा नये. आपल्याला यासाठी देखील सतर्क रहावं लागेल की तिथल्या नाजूक स्थितींचा कोणताही देश आपल्या स्वार्थासाठी एका हत्याराप्रमाणं वापर करण्याची हिंमत करता कामा नये. यावेळी अफगाणिस्तानच्या जनतेला तिथल्या महिलांना आणि मुलांना तिथल्या अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. यामध्ये आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावीच लागेल."

"आपले समुद्र देखील आपला वारसा आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्ष ठेवायला हवं की, त्याचा गैरवापर होता कामा नये. आपले समुद्र हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाईफलाईनही आहेत. याला आपल्याला विस्तारवाद्यांच्या तावडीतून वाचवावं लागेल," असं आवाहनही यावेळी मोदींनी युएनच्या आमसभेत जगाला उद्देशून केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT