Monkeypox esakal
ग्लोबल

Monkeypox outbreak : संभोगाचे जोडीदार कमी करा; WHO चा इशारा

मंकीपॉक्सचा शिरकाव झालेले देश आणि तेथील संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभोगाचे जोडीदार कमी करावेत असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मंकीपॉक्सचा शिरकाव झालेले देश आणि तेथील संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभोगाचे जोडीदार कमी करावेत असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) केले आहे.

जिनिव्हा - मंकीपॉक्सचा शिरकाव झालेले देश आणि तेथील संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभोगाचे जोडीदार कमी करावेत असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) केले आहे.

डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांच्या निवेदनानुसार ९८ टक्के रुग्ण समलिंगी पुरुष आहेत. अशावेळी संसर्गाचा धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग संभोगाचे जोडीदार कमी करणे हा ठरतो असे त्यांनी सांगितले.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडीसीनमध्ये अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार ९८ टक्के रुग्ण समलिंगी किंवा उभयलिंगी पुरुष आहेत. यातील ९५ टक्के रुग्णांना संभोगातून संसर्ग झाला. मंकीपॉक्स हा अद्याप संभोगातून संसर्ग होणारा विकार म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही.

डब्लूएचओच्या शिफारशी

- समलिंगी पुरुषांनी संभोगाचे जोडीदार कमी करावेत

- नव्या जोडीदारांसह संभोगाबाबत फेरविचार करावा

- एखाद्या नव्या जोडीदारासह संभोग केल्यास त्यांच्या संपर्काचा तपशील घ्यावा, जेणेकरून गरज पडल्यास फॉलो-अपसाठी संपर्क साधता येईल

  • १८००० मंकीपॉक्सचे रुग्ण

  • ७८ रुग्ण आढळलेले देश

  • ७० युरोपमधील टक्केवारी

  • २५ अमेरिकेतील टक्केवारी

  • ५ मे महिन्यापासूनचे बळी

  • १० उपचारासाठी रुग्णालयात जावे लागलेल्या रुग्णांची टक्केवारी

सामुहिक लसीकरण नको

कोरोना काळात बहुतांश देशांमध्ये सामुहिक लसीकरणावर भर देण्यात आला होता. मंकीपॉक्सबाबत या टप्प्यास अशी शिफारस नसल्याचे टेड्रोस यांनी यांनी स्पष्ट केले. हा विकार झालेल्यांच्या संपर्कात आलेले, आरोग्यसेवकांसह संसर्गाचा जास्त धोका असलेले तसेच संभोगासाठी एकापेक्षा जास्त जोडीदार असलेले यांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवावे असे नमूद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT