Kami Rita Sherpa 
ग्लोबल

Mount Everest: 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम मोडीत 29 वेळा सर केलं जगातील सर्वात उंच शिखर

Nepal Kami Rita Sherpa: विशेष म्हणजे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. याआधी त्यांनी २८ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे.

कार्तिक पुजारी

काटमांडू- नेपाळच्या कामी रीटा शेर्पाने रविवारी सकाळी पराक्रम केला आहे. त्यांनी २९ वेळा जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. याआधी त्यांनी २८ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कामी रीटा यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून देखील ओळखलं जातं. ५४ वर्षीय शेर्पा आणि गाईड असलेल्या कामी रीटा यांनी मागील वर्षी वसंत ऋतूमध्ये माऊंट एव्हरेस्ट दोनवेळा सर केलं होतं. अठ्ठावीसव्यांदा त्यांनी हा पराक्रम केला होता. त्यांनी आपलाच विक्रम मोडण्याचे सुतोवाच त्यावेळी केले होते. माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर आहे. तो जगातील सर्वात उंच शिखर आहे.

कामी रीटा हे नेपाळचे शेर्पा असून माऊंट एव्हरेस्ट २९ वेळा सर करणारे ते जगातील एकमेव व्यक्ती आहेत. माऊंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा म्हटलं जातं. शेर्पा कामी रीटा म्हणाले की, 'किती वेळा सागरमाथा सर करायचं याचं काही डोक्यात नाही. जोपर्यंत वाटेल तोपर्यंत सागरमाथा सर करत राहीन.'

पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेर्पा कामी रीटा हे सकाळी सात वाजून २५ मिनिटाला शिखरावर पोहोचले होते. ही मोहीम 'सेव्हन समिट ट्रेक्स'कडून आयोजित करण्यात आली होती. या कामगिरीनंतर कामी रीटा यांचे जगभरातून कौतुक होत आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करणे ही मोठी आव्हानाची गोष्ट आहे. अनेक जणांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या नादात जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामी रीटा हे मे महिन्याच्या सुरुवातीला काटमांडू येथून २८ गिर्यारोहकांसोबत माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले होते. ते गाईड म्हणून काम करत होते. यापूर्वी पासांग देवा शेर्पा यांनी सागरमाथा २७ वेळा सर केला आहे. ते पुन्हा सागरमाथा सर करणार आहेत का, याबाबत कोणतीही माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल! अंधार पडताच होणार नवा नियम लागू; ICC ने घेतले मोठे निर्णय

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : केरळम मध्ये अमली पदार्थ माफियांविरुद्ध 'ऑपरेशन तूफान'ची घोषणा

SCROLL FOR NEXT