china
china  
ग्लोबल

चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप; वुहानपेक्षा नानजिंगमध्ये वाईट स्थिती

कार्तिक पुजारी

चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर सरकारने लोकांना घरात बंद करण्यासह अनेक कठोर पाऊल उचलली. त्यामुळे कोरोना महामारी आटोक्यात आली, पण चीनच्या नानजिंग शहरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा प्रकोप सुरु झाला आहे.

बिजिंग- चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर सरकारने लोकांना घरात बंद करण्यासह अनेक कठोर पाऊल उचलली. त्यामुळे कोरोना महामारी आटोक्यात आली, पण चीनच्या नानजिंग शहरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा प्रकोप सुरु झाला आहे. स्थानिक माध्यमानुसार, ही परिस्थिती वुहानपेक्षा बिकट आहे. नानजिंगमधून प्रसार होत विषाणू चीनच्या पाच प्रांतासह बिजिंगपर्यंत पोहोचला आहे. (new-virus-outbreak-in-china-nanjing-city-worst-since-wuhan-chinese-state-media-delta-variant)

नागजिंग शहरात २० जुलैला नव्या कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर चीनने याठिकाणी कठोर निर्बंध लागू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्टपर्यंत नानजिंग एअरपोर्टची सर्व फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिन्हुआ न्युजच्या माहितीनुसार, शहराची लोकसंख्या ९३ लाख आहे. या सर्वांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये लोकांच्या लांबचलाब रांगा पाहायला मिळत आहेत.

लोकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे आणि एकमेकांपासून १ मीटरचे अंतर ठेवण्यास सांगण्यात आलंय. रांगेत उभे ठाकले असल्यास एकमेकांशी न बोलण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना महामारी पसरण्याचे कारण डेल्या व्हेरियंट आहे. नानजिंग एअरपोर्ट सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे. याठिकाणी पहिला रुग्ण एअरपोर्टवरच आढळला होता. येथील सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

डेल्टा व्हेरियंट राजधानी बिजिंग आणि चेंहदूसह १३ शहरांमध्ये पसरला आहे. असे असले तरी ग्लोबल टाईम्सने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटलंय की, संक्रमण सध्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे आणि यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. संसर्ग पसरत असल्याने चीनच्या कोरोना प्रतिबंधक लसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संक्रमित झालेल्या लोकांना कोरोनावरील लस दिली गेली आहे का? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नानजिंगमधून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चीनची चिंता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT