ग्लोबल

PM Modi : ''सहा मुस्लिम देशांवर बॉम्बहल्ले करणाऱ्यांनी आम्हांला सांगू नये'' मोदींच्या बचावासाठी सीतारामण सरसावल्या

संतोष कानडे

नवी दिल्लीः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानाचा निर्मला सीतारामण यांनी समाचार घेतला आहे.

'भारतातील मुस्लिमांच्या परिस्थितीवर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारेन' असं म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदी आणि भारत सरकारवर निशाणा साधला होता. त्याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

सीतारामण म्हणाल्या की, बराक ओबामा यांच्या काळामध्ये ६ मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. भारतात कोणत्याही समाजामध्ये भेदभाव केला जात नाही. 'सबका साथ-सबका विकास' यावर सरकारचा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील पत्रकार परिषदेत हेच सांगितलं आहे.

सीतारामण पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १३ देशांनी सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला. त्यामध्ये सहा मुस्लिमबहुल देश आहेत. परंतु ज्या समस्याच नाहीत, त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ते चुकीचे आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. काल ते इजिप्तच्या दौऱ्यावर होते. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. अमेरिकेच्या संसदेतही मोदींनी भाषण केलं. त्यामुळे त्यांची जगभरात चर्चा झाली. याच अनुषंगाने ओबामांनी मोदींना लक्ष्य केलं. त्याला निर्मला सीतारामण यांनी उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT