ग्लोबल

Nobel Prize in Economics : बेन बर्नान्के, डग्लस डायमंड अन् फिलिप डिबिगोंना नोबेल जाहीर

सकाळ डिजिटल टीम

Nobel Prize in Economics 2022 : स्वीडिश नोबेल समितीने अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केले असून, 2022 च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी बेन बर्नांक, डग्लस डायमंड आणि फिलिप डिबिगो यांना विभागून देण्यात आला आहे. आर्थिक मंदीच्या काळात बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी या तिघांनी संशोधन केले आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी चांगले पर्याय सूचवले होते. याची दखल घेत आज या तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नोबेल विजेते तिन्ही तज्ज्ञ अमेरिकेतील आहेत. गेल्या वर्षी डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना त्यांच्या कार्यासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते.

यंदाचे साहित्यातील नोबेल फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना जाहीर

यंदाचा साहित्यातील नोबेल फ्रेंच लेखिका अॅनी अर्नो (Annie Ernaux) यांना जाहीर झाले असून अ‍ॅनी यांचा जन्म 1 सप्टेंबर 1940 रोजी झाला. त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्य विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे साहित्यिक कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे.

रसायनशास्त्रातील नोबेल

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅरोलिन बरटोजी, कोपनहेगन (डेनमार्क) विद्यापीठाचे मॉर्टेन मीएलडोल आणि अमेरिकेचे स्क्रिप्स रिसर्च सेंटर के. के बॅरी शार्पलेस यांना दिले. क्लिक केमेस्ट्री आणि बायोर्थोगोनल रसायनशास्त्राच्या विकासासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

भौतिकशास्त्रातील नोबेल

2022 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही जाहीर झाले आहे. क्वांटम मेकॅनिक्स क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल या वर्षी हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला. फ्रान्सचे शास्त्रज्ञ एलेन आस्पेक्ट, अमेरिकेचे जॉन एफ क्लॉजर आणि ऑस्ट्रियाचे अँटोन जेलिंगर यांना 10 मिलीयन स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.5 कोटी रुपये) मिळणार आहेत. स्कॉटहोम येथील रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सने मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली.

स्वीडनच्या पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

यंदाचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना जाहीर झाले आहे. 'मानवांची उत्क्रांती' या विषयावरील शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पाबो यांनी आधुनिक मानव आणि विलुप्त प्रजातींच्या जीनोमची तुलना करत ते मिश्रित असल्याचे शोधून काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT