ग्लोबल

कर्करोगावरील उपचारपद्धतीला नोबेल 

पीटीआय

स्टॉकहोम (पीटीआय) : कर्करोगावरील उपचारासाठी नवी क्रांतिकारी उपचारपद्धती विकसित करणारे अमेरिकेचे जेम्स ऍलिसन आणि जपानचे तासुकू होंजो यांना या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत जातो. कर्करोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रोग्याला मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करण्यात येत होते. ऍलिसन आणि होंजो यांनी नवी उपचार पद्धती शोधून काढली. या नव्या पद्धतीमुळे रोग्याची कर्करोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल आणि शरीरातील पेशी या कर्करोगापासून सुरक्षित राहू शकतील. या नव्या पद्धतीमुळे रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतील. या कामगिरीबद्दल ऍलिसन आणि होंजो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नव्या उपचारपद्धतीमध्ये काही प्रथिने आणि कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य केले जाते. विशेषतः कर्करुग्णांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शरीरात तयार होणारी नैसर्गिक प्रतिजैविके कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोचू शकत नाहीत. प्रथिनांमुळे निर्माण होणारा हा अडथळा दूर करून शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली अधिक सक्षमपणे नव्या उपचार पद्धतीमुळे काम करू शकते, असे नोबेल समितीने म्हटले आहे. 

ऍलिसन हे टेक्‍सास विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर होंजो हे क्‍योटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आशियाचे नोबेल समजला जाणारा टॅंग पुरस्कार 2014मध्ये होंजो यांना मिळाला होता. स्टॉकहोमध्ये 10 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात दोघांनाही नोबेलने सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह व 90 लाख स्वीडीश क्रोनर असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्या (ता.2 ) भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात येणार आहे, तर बुधवारी (ता. 3) रसायनशास्त्रातील संशोधनासाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात येईल. शांततेचे नोबेल शुक्रवारी (ता. 5), तर अर्थशास्त्रातील नोबेल पुढील सोमवारी (ता. 8 ) जाहीर करण्यात येणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच साहित्याचे नोबेल देण्यात येणार नाहीये. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

Supreme Court: पती दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये? पत्नीने मागितले कॉल रेकॉर्ड; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi Live Update: मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा चौथा दिवस; अनेक भागांतील शाळांना सुट्टी

White Mongoose VIDEO : कोकणात निसर्गाचा चमत्कार! चिपळूणमध्ये आढळले दुर्मीळ 'पांढरे मुंगूस'; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, काय आहे पांढऱ्या रंगामागचं कारण?

Maharashtra Gears Up for UCC : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यात घेतला जाणार मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT