North Korean spy satellite falls Intended to capture US military movement
North Korean spy satellite falls Intended to capture US military movement sakal
ग्लोबल

North Korean : उत्तर कोरियाचा हेरगिरी उपग्रह पडला; अमेरिकी सैन्याच्या हालचाली टिपण्याचा हेतू

सकाळ वृत्तसेवा

सोल : उत्तर कोरियाने हेरगिरीसाठीचा पहिला उपग्रह बुधवारी अवकाशात सोडला. पण तो समुद्रात पडल्याने त्याचे उड्डाण अयशस्वी ठरले. ‘द कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ या उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

अमेरिकेच्या सैन्यदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने आता पुन्हा ११ जून रोजी उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल, असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले. उत्तर कोरियाच्या सोहो उपग्रह उड्डाणतळावरून ‘चोलिमा-१’ या रॉकेटद्वारे नियोजित वेळेनुसार आज सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी ‘मल्लिगयोंग- १’चे प्रक्षेपण करण्यात आले.

उड्डाणानंतर पहिल्या टप्‍प्यातील विलगीकरणानंतर दुसऱ्या टप्प्यात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रॉकेटचा वेग मंदावून ते कोरियाच्या पश्‍चिम समुद्रात उपग्रहासह पडले, असे वृत्तसंस्थेने सांगितले. उपग्रह पडण्यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे उत्तर कोरियाने सांगितले.

हेरगिरी उपग्रह अयशस्वी ठरल्याने अध्यक्ष व हुकूमशहा किंग जोंग उन यांच्या सैन्याची क्षमता मजबूत करण्याच्या प्रयत्नांवरही पाणी फिरल्याचे सांगण्यात आले. उत्तर कोरियाच्या सीमेवर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याचा संयुक्त सराव सुरू असल्याने तणाव वाढला आहे. त्यामुळे जोंग यांनी अमेरिकेच्या सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी हा उपग्रह आज अवकाशात पाठविला होता.

उपग्रहाच्या ज्या भागात उड्डाणानंतर बिघाड झाला, त्याचे छायाचित्र दक्षिण कोरियाने प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने एक पांढऱ्या, धातूच्या सिलिंडरचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे, ज्याला उत्तर कोरिया हेरगिरी उपग्रहाचा एक भाग असल्याचा दावा करीत आहे.

कोरियाकडे एकही उपग्रह नाही उत्तर कोरियाकडे सध्या अवकाशात कार्यरत एकही उपग्रह नाही. त्यामुळे किम जोंग उन त्यांनी हेरगिरी करणारा उपग्रह तयार करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. काही उपग्रहांच्या उड्डाणाच्या तयारीची पाहणी ते स्वतः करीत आहेत.

उत्तर कोरियात संदेशाने घबराट

उत्तर कोरियाच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. ‘नागरिकांनो, कृपया बाहेर पडण्याची तयारी करा. प्रथम मुले आणि वृद्धांना बाहेर काढा,’ असा, संदेश सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी देण्यात आला.

यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. याकाळात तेथील इंटरनेटसेवाही पाच मिनिटांसाठी ठप्प झाली होती. संपूर्ण शहरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर २० मिनिटांनी हा संदेश चुकून प्रसारित केल्याचे सांगण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले होते. अशा प्रकारच्या गंभीर चुकीची जबाबदारी स्वीकारून सोलचे महापौर ओह से-हून यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीने सोशल मीडियावर जोर धरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT