Omicron variant sakal media
ग्लोबल

ओमिक्रॉन हवेद्वारे दोन खोल्यांमध्ये पसरू शकतो, अभ्यासातून समोर आली माहिती

सकाळ डिजिटल टीम

सध्या जगावर ओमिक्रॉनचं (Omicron) संकट आहे. त्यातच आता दोन खोल्यांमध्ये देखील ओमिक्रॉनचा संसर्ग पसरू शकतो, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. दोन व्यक्तींना हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. दोघांचा एकमेकांसोबत कुठलाही संपर्क आला नाही. तरीही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली असून गंभीर लक्षणं दिसून आली. त्यावर केलेल्या अभ्यासाचा अहवाल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

अभ्यासानुसार, दोन्ही व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले होते. त्यांना हॉटेलमधील दोन खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच याठिकाणी क्वारंटाइनचे नियम देखील अत्यंत कडक आहेत. मात्र, एका रुग्णाला १३ नोव्हेंबरला कोरोनाची लागण झाली. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर १७ नोव्हेंबरला दुसरा देखील पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघंही एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे दिसून आले. तसेच दोघेही वेगवेगळ्या दिवशी हॉटेलमध्ये आले होते. त्यामुळे त्यांची चाचणी एकाच दिवशी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जेव्हा जेवण किंवा कुठल्या वस्तू घेण्यासाठी दरवाजा उघडला त्यावेळी या विषाणूचा हवेमधून प्रसार झाला असावा, अशी चिंता या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

ओमिक्रॉन सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्याचे बोलले जात आहे. पण, याबाबत अजूनही अनेक गोष्टी माहिती नाहीत. त्यामुळे यावर अभ्यास करून वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. भारतात दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरातमध्ये या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले असून ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT