Our Country is starting to OPEN FOR BUSINESS again says donald trump 
ग्लोबल

Coronavirus : सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेल्या अमेरिकेत उद्योगधंदे चालू होणार; ट्रम्प यांची घोषणा

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : जगभरात अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ४५ हजारांपेक्षा जास्त बळी गेलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला असून 8 लाख 26 हजार जणांना कोरोनाची लागण झाली. जगात सर्वात शक्तिशाली असलेल्या अमरिकेच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिका ही दुहेरी संकटात सापडली आहे. म्हणूनच या दुहेरी संकटातून अमेरिकेला वाचवण्याठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे. 

ट्रम्प म्हणाले, 'अमेरिका सुरक्षितपणे पुर्वपदावर येत आहे. आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा खुली करत आहोत. देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची आम्ही काळजी घेत होतो आणि घेत राहू त्याला आमचं प्राधान्य आहे. त्यांच्या जीवांची आम्हाला सर्वात जास्त काळजी आहे. दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फक्त लॉकडाऊन हाच उपाय नाही. त्यामुळे देशाला मोठ आर्थिक फटका बसतो. त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कोरोनाशी लढत असतानाच अर्थचक्र पुन्हा सुरू केलं पाहिजे असा सल्ला त्यांना तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळेच ट्रम्प यांनी ही घोषणा केली. अमेरिकेतल्या अनेक राज्यांनीही लॉकडाऊनला विरोध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

SCROLL FOR NEXT