Pakistan army 
ग्लोबल

Pakistan: बलुचिस्तानमध्ये भीषण स्फोट; 5 पोलिसांचा मृत्यू

कार्तिक पुजारी

पाकिस्तानातील भीषण स्फोटात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा शहरात हा स्फोट झाला.

Pakistan इस्लामाबाद- पाकिस्तानातील भीषण स्फोटात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा शहरात हा स्फोट झाला. यामध्ये पोलिसांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की यात 5 पोलिसांचा मृत्यू झालाय, तर एकूण 12 जण जखमी झाले आहेत. यात आठ पोलिसांचा समावेश आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

प्राथमिक अंदाजानुसार बॉम्ब एका मोटार बाईकमध्ये लावण्यात आला होता. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शेहवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच दोन नागरिकही जखमी झाले आहेत. पोलीस गाडीला लक्ष्य करण्यात आले होते. गाडी क्वेटामधील सेरेना हॉटेलजवळ तंझीम स्क्वेरजवळ थांबली होती, त्यावेळी स्फोट झाला. सुरक्षा दलांनी तपास सुरु केला असून परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे.

स्फोटामध्ये आजुबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. पण, बलूच कार्यकर्ते या प्रांतात सक्रिय आहेत आणि त्यांनी अनेकदा सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. बलूच कार्यकर्त्यांचा रोष केंद्र सरकारवर आहे. केंद्र सरकार प्रांतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जम कमल खान यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांना प्रांताती शांतता नष्ट करायची आहे, पण ते या प्रयत्नात कधीही यशस्वी होणार नाही, असं ते म्हणाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने सांगितलेल्या माहितीनुसार, स्फोटासाठी IED (improvised explosive device)चा वापर करण्यात आला होता. देशभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊलं उचलण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT