Pakistan Crisis esakal
ग्लोबल

Pakistan Crisis : पाकिस्तानी अर्थमंत्री अल्ला भरोसे, "अल्लाने देश बनवला तोच आता .."

सध्या पाकीस्तानची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली आहे. यातून मार्ग काढायचा की, अल्ला भरोसे सोडायचं अशी मनःस्थिती इथल्या अधिकाऱ्यांची बघायला मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Finance Minister Viral Post : कर्जात पार बुडालेल्या पाकीस्तानला डोकं वर काढणंही कठीण झालं आहे. इथे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून ते अगदी पेट्रोल पर्यंत सर्वच गोष्टींची वानवा झाली आहे. देशाच्या भयानक दूरावस्थेची अनेक कारणे असली तरी आज पाकीस्तानी सरकारकडे लोकांचे पगार देण्याएवढेही पैसे नाहीत ही सध्य परिस्थिती आहे.

जेव्हा माणसाला आपल्या हातात काही नाही असं वाटतं त्यावेळी त्याला देवाची आठवण येते हे सत्य आहे. असंच काहीसं आता पाकिस्तानी अर्थमंत्र्यांचं झालं आहे. करून सरून भागला अन देव पूजेला लागला अशी म्हण इथे लागू पडते असं म्हणायला हरकत नाही. कारण अशाच काहीशा आशयाची पोस्ट पाकिस्तानी अर्थमंत्री इशक दार यांनी इंस्टाग्रामवर टाकली आहे.

त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पाकिस्तान हा असा एकमेव देश आहे जो अल्लाच्या नावावर तयार झाला. त्यामुळे अल्लाच त्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जबाबदार आहे. आता देशाला या भयानक परिस्थितीतूनही अल्लाच बाहेर काढेल."

त्यांची ही पोस्ट काही वेळातच मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. आणि लोकांनी त्यांना भरपूर ट्रोलही केलं आहे. काहींनी म्हटलं आहे की, त्यांना इतिहासाचं पुस्तक द्या, पाकिस्तान ब्रिटीशांनी बनवला आहे., एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, सगळं अल्लाच करणार तर तुम्ही त्या पदावर का बसला आहात? तर एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, आमच्या निर्मला ताईंना घेऊन जा सर्व ठिक होईल. तर काहींना खरच पाकिस्तान आता अल्ला भरोसे आहे, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : नगरविकास खाते पैसे खाण्याचे कुरण, संजय राऊत यांचा मोठा आरोप

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT