ग्लोबल

हाफिज सईदची राष्ट्र संघात याचिका

वृत्तसंस्था

दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्याची मागणी

लाहोर: माझ्या विरोधातील कुठलाही आरोप दहशतवादाशी संबंधित नाही. तसेच, पाकिस्तानी न्यायालयात हे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत, असे सांगत दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्याची मागणी हाफिज सईदने राष्ट्र संघाकडे (यूएन) केली आहे.

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा "मास्टर माइंड' हाफिज सईद याने "यूएन'कडे याचिका दाखल केली आहे. "यूएन'च्या दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून सईदने केली आहे. माझ्या विरोधातील आरोप हे दहशतवादाशी संबंधित नाहीत. तसेच, हे आरोप पाकिस्तानी न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत, असे सईदने म्हटले आहे. बंदी घालण्यात आलेल्या "जमात-उद-दावा'चा प्रमुख असलेल्या सईदला पकडून देणाऱ्यास एक कोटी डॉलरचे बक्षीस अमेरिकेने जाहीर केलेले आहे. स्थानबद्धतेची मुदत वाढविण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर सईदला शुक्रवारी मुक्त करण्यात आले होते. चालू वर्षी जानेवारीपासून सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सईदच्या वतीने लाहोरमधील संस्थेने "यूएन'मध्ये ही याचिका दाखल केली आहे.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

SCROLL FOR NEXT