crime
crime esakal
ग्लोबल

Pakistan News : गुंगीचं औषध दिलं अन्..., हिंदू तरुणीसोबत पाकिस्तानी डॉक्टरांचे घृणास्पद कृत्य!

सकाळ डिजिटल टीम

Crime News : पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू समाजातील एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घृणास्पद घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील एका हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी आलेल्या एका २३ वर्षीय हिंदू तरूणीवर डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार केला.

किडनीच्या इलाजासाठी आलेल्या या तरुणीची संबंधित घटनेनंतर तब्येत बिघडल्याने तिला हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिंध प्रांताच्या टंडो मुहम्मद खान शहरातील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरने तिला गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर त्या फिर्यादीची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आहे.

आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार असल्याचे तपासातून समोर आले आहे. अल्पसंख्याक हिंदू समाजातील मुली व सूना रुग्णालयातही सुरक्षित नाहीत असे म्हणत पीडितेच्या कुटुंबियांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी केली आहे.

सोशल मीडियावर चर्चा...

सामूहिक बलात्कारानंतर पीडितेच्या वक्तव्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान डिफेन्स नावाच्या वेबसाईटनं आपल्या रिपोर्टसोबत फराज परवेझची एक्स पोस्ट शेअर केली आहे. पाकिस्तानमधील हिंदू अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या फराजने आपल्या एक्स-पोस्टमध्ये पीडितेच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती स्थानिक भाषेत या भीषण घटनेची माहिती देत ​​आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT