ग्लोबल

पाकिस्तानचे पंतप्रधान कोरोनाबाधित, दोन दिवसांपूर्वीच घेतली होती चिनी लस

सकाळन्यूजनेटवर्क

Pakistan PM Imran Khan tests positive : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काळजी म्हणून पंतप्रधान इम्रान खान स्वत:च्याच घरात  विलगीकरणात आहेत.  विशेष म्हणजे, गुरुवारी इम्रान खान यांनी सायनोफार्म कोविड-19 या चायनीज लशीचा डोस घेतला होता. त्यानंतर, शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला आहे.  पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.

६८ वर्षीय इम्रान खान माजी क्रिकेटपटू असून गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानच्या राजकारणामध्ये सक्रीय आहेत. गुरुवारी १८ मार्च रोजी इम्रान खान यांनी कोरोना प्रतिबंधक सायनोफार्म या चायनीज लसीचा डोस घेतला होता. त्यानंतर देशातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, असं आव्हान केलं होतं.

पाकिस्तानी प्रधानमंत्री कार्यालयानं गुरुवारी ट्विट करत म्हटलेय की, 'प्रधानमंत्री इम्रान खान यांनी आज, कोरोना लशीचा डोस घेतला आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची विनंती केली.' कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्याची घोषणा, पाकिस्तान सरकारनं केली आहे. 

पाकिस्तानमध्ये कोरोनाची तिसरी लाट -
जगभरात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. काही ठिकाणी कोरोनाची दुसरी तर काही देशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनानं हाहाकार माजवला आहे. शनिवारी पाकस्तानमध्ये तीन हजार ८७६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ जाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना संक्रमणाचा द ९.४ टक्केंवर पोहचला आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा लाख २३ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १३ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील दोन हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित गंभीर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT