पाकिस्तान नौदलाकडून पुन्हा गोळीबार  Google
ग्लोबल

पाकिस्तान नौदलाकडून पुन्हा गोळीबार ; एका मच्छिमाराचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या नौदलाकडून (Pakistan Navy) करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला. तर एक मच्छिमार जखमी झाला आहे. पाकिस्तानकडून रविवारी गुजरातमधील (Gujrat) जलपरी नावाच्या भारतीय बोटीवर (Firing on Jalpari boat) गोळ्या झाडण्यात आल्या. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव श्रीधर आहे. जखमी मच्छिमाराला द्वारका हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समुद्री सीमेबाबत कुठलीही स्पष्टता नाही. आपल्या देशाच्या हद्दीत घुसखोरी झाल्याचा दावा करत पाकिस्तानकडून भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने यापूर्वीही मच्छिमारांना अटक केली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानी नौसेनेने दोन बोटींवर हल्ला केला होता. त्यावेळी बोटीवर 8 लोक होते. त्यातील उत्तर प्रदेशातील एक मच्छिमार जखमी झाला होता.

मच्छिमारांना पाकिस्तानने केली होती अटक

याआधिही मार्च महिन्यात 11 मच्छिमारांना अटक केली होती. दोन बोटी जप्त केल्या होत्या. याशिवाय फेब्रुवारीत 17 भारतीय मच्छिमारांना जलक्षेत्रात प्रवेश केला म्हणून अटक करून तीन बोटी जप्त केल्या होत्या.

मच्छिमारांना सीमा हद्दीचा फटका

मासेमारी करत असताना बऱ्याचदा मच्छिमार देशाची सीमा ओलांडतात. एकदा दुसऱ्या देशाकडून अटक झाली कि,सुटका होण्यास काही महिने तर कधी-कधी काही वर्षं मच्छिमार परक्या देशात अडकून पडतात. अटक झाल्यानंतर सुटका होईपर्यंत मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.

श्रीलंकेनंही केली होती अटक

भारतीय मच्छिमारांना श्रीलंका देशाकडून यापूर्वी त्रास झाला आहे. गेल्या महिन्यांत याचकारणावरून श्रीलंकेनं 23 मच्छिमारांना अटक केली होती. मार्च महिन्यातही श्रीलंकेनं 54 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT