imran khan 
ग्लोबल

इम्रान खान यांच्या बलात्कारावरील वक्तव्यावरुन घटस्फोटीत पत्नीने सुनावलं, म्हणाली...

सकाळवृत्तसेवा

इस्लामाबाद : देशात वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानच्या नागरिकांच्या इम्रान सरकारविरोधात नाराजीचे सूर आहेत. अशातच आता त्यांचं एक वक्तव्य टीकेस पात्र ठरलं आहे. बलात्कारासाठी समाजातील वाढती अश्लिलता जबाबदार असल्याचं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग झालं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांनीही आक्षेप नोंदवला आहे. एवढंच नव्हे तर इम्रान खान यांची पूर्व घटस्फोटीत पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनीदेखील या प्रकरणावरुन ट्विट केलं आहे.

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काय होतं विधान?
अलिकडेच टेलिफोनवरील चर्चेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात इम्रान खान यांनी म्हटलं की, इतिहास आपल्याला सांगतो की, समाजात जेंव्हा अश्लिलता वाढते तेंव्हा सेक्ससंबंधी गुन्हे वाढतात आणि पारिवारिक ढाचा कोलमडतो. समाजातील वाढत्या अश्लीलतेमुळे बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. इम्रान खान हे स्वत: ऑक्सफर्ड सारख्या विद्यापिठातून शिकले आहेत. मात्र, बलात्कारांबद्दल बोलताना महिलांनी संपूर्ण कपड्यांमध्ये रहायला पाहिजे म्हणजेच 'पर्दे में रहें' असा सल्लाही दिला आहे, ज्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर इम्रान खान यांच्यावरुन मोठ्या प्रमाणावर मीम्स बनवले गेले आहेत. अनेकांनी त्यांच्या पाश्चिमात्त्य पेहरावातील फोटो  शेअर केले आहेत. खान यांच्या या वक्तव्यावर लोकांनी टीकेची झोड उठवली आहे.

लैंगिक हिंसेबाबत इम्रान खान यांचं हे मत समोर आल्यानंतर पाकिस्तानी पत्रकार रीमा उमर यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, बलात्काराला अश्लिलतेसोबत जोडणारं इम्रान खान यांचं वक्तव्य त्यांचं अज्ञान दाखवून देतं. हे वक्तव्य खतरनाक आणि निंदनीय आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, बलात्काराबाबत त्यांचं हे विधान दाखवून देतं की त्यांना याबद्दल काहीही समज नाहीये. हे विधान पीडितांना जबाबदार ठरवून अपराध्यांना संरक्षण प्रदान करणारं आहे. 

पूर्व पत्नी जेमिमा यांचीही टीका
इम्रान खान यांची पूर्व पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. जेमिमा यांनी म्हटलंय की, याला जबाबदार महिला नाहीयेत तर पुरुष आहेत. पुरुषांनी आपल्या नजरेवर आणि गुप्तांगावर नियंत्रण मिळवावं. हे कुराणमध्ये म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी दिला आहे. याची जबाबदारी पुरुषांची आहे. महिला कपडे कशा घालतात ही अडचण नाहीये, असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC : इशान किशनचा रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध 'तोडफोड' फटकेबाजी, मोडला गौतम गंभीरचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रम

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

Ishan Kishan : ईशान किशन लवकरच विवाहबंधनात? आजोबांनी दिले संकेत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

Dharashiv Crime : कला केंद्राच्या छम छम मुळे पुन्हा एकाचा खुन; महाकाली कलाकेंद्राच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे जिल्हाप्रशासन हातबल

Horoscope Prediction : यंदाचा शिमगा 5 राशींना जाणार अत्यंत सुखात ! होळीपूर्वीच येणार सोन्याचे दिवस, पैशांची भरभराट

SCROLL FOR NEXT