ग्लोबल

Peru : २६ वर्षीय तरूणाच्या बॅगेत सापडली ८०० वर्षाची गर्लफ्रेंड; फोटो पहाल तर चक्रावून जाल!

तो फुड डिलीव्हरीच्या बॅगेत ममी घेऊन फिरत होता

सकाळ डिजिटल टीम

हेडींग वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल नाही का? एका २६ वर्षीय तरूणाच्या ट्रॅव्हल बॅगेत त्याच्या गर्लफ्रेंडचा हाडांचा सापळा सापडला आहे. होय हे खरं आहे. हा प्रकार आपल्या नाही तर पेरू देशात घडला आहे.

पेरूतील 26 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून 800 वर्षे जुनी ममी सापडली आहे. ममीचा सांगाडा पाहून पोलिसांनी चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक बाब सांगितली. तो म्हणाला की ती माझी स्पिरिचुअल गर्लफ्रेंड आहे. सध्या पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

पेरु पोलिसांनी मंगळवारी 26 वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजोला ताब्यात घेतले. ज्युलिओ एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे 600 ते 800 वर्षे जुनी ममी अर्थात मानवी सांगाडा जप्त केला आहे.

ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवो त्याच बॅगेत त्याने ममी ठेवली होती. पोलिसांच्या चौकशीत त्याने आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्याच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ही ममी विकत घेऊन घरी आणल्याचा दावा केला होता.

फूड डिलिव्हरी बॉयने त्या ममीचे नाव 'जुआनिटा' ठेवले. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युलिओ असे म्हणताना दिसत आहे की, जुआनिता  माझ्या खोलीत माझ्यासोबत घरी राहते. ती माझ्यासोबत झोपते आणि मी तिची काळजी घेतो. ती माझी स्पिरिचुअल प्रेयसी आहे.

या मुद्द्यावर पेरूच्या मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पुनोच्या पूर्वेकडील प्रदेशातील ही ममी असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. ती एका पुरूषाची ममी आहे. तिचे वान जुआन आहे. तो व्यक्ती वयाच्या ४५ व्या वर्षी मृत्यूमुखी पडला असेल. तेव्हापासून ८०० वर्ष उलटून गेली आहेत. सरकारने त्या तरूणाकडून ही ममी जप्त केली असून त्यांनी तिला संग्रहालयात ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT