ग्लोबल

Modi-Meloni Meet: PM मोदी अन् इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनींची पुन्हा झाली भेट; काय झाली चर्चा?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रशंसक आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

दुबई : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रशंसक आहेत. मेलोनी या उजव्या विचारसरणीच्या खंद्या समर्थक असल्यानं भारतातील मोदी सरकारच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं.

दिल्लीतील G20 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी मोदींनं कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीची चर्चा रंगली होती. त्यानंतर आज पुन्हा या दोघांची दुबईमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या COP28 संमेलनात भेट झाली. यावेळी दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा देखील पार पडली. (PM Narendra Modi Met PM Giorgia Meloni of Italy on the occasion of COP28 Summit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच खुद्द आपल्या ट्विटर हँडलवरुन या भेटीचा फोटो शेअर केला. तसेच इटालियन भाषेत त्यांनी काही मजूकरही लिहिला आहे. भारत आणि इटलीमधील राजनैतिक संबंधांबाबत त्यांच्यामध्ये यावेळी चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

एएनआयनं मोदींच्या ट्विटरपोस्टचं इंग्रजीत भाषांतर करत सांगितलं की, मोदींनी आपल्या ट्विटरवर म्हटलं, COP28 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटलो. यावेळी दोघांमध्ये भारत आणि इटली या दोन्ही देशांच्या शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी प्रयत्नपूर्वक सहकार्य करण्याची चर्चा झाली. (Marathi Tajya Batmya)

भारतात होणार पर्यावरण बदल समिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतीक जलवायू कारवाई शिखर संमेलनाला (COP28) हजेरी लावली. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं. यावेळी मोदी म्हणाले, भारत हे जगासमोर पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये संतुलन राखल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच त्यांनी COP33 ही आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात घेण्याचा प्रस्तावही ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT