PM Modi in Germany Sakal
ग्लोबल

पंतप्रधानांनी मिसळला लहानग्याच्या सुरात सूर; गाण्यावर धरला ताल

जर्मनीमधल्या एका भारतीय वंशाच्या लहान मुलाने पंतप्रधान मोदींसमोर देशभक्तीपर गीत गायलं.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच ते जर्मनीत दाखल झाले असून तिथल्या काही भारतीयांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी पंतप्रधान मोदी काही भारतीय वंशाच्या लहान मुलांची भेट घेत त्यांचं कौतुकही केलं.

एका लहान मुलीने पंतप्रधान मोदींना एक चित्र भेट दिलं. त्यावेळी मोदी या चित्रपटाकडे पाहतच राहिले. त्यांनी या मुलीचं कौतुकही केलं. त्याचबरोबर त्यांनी एका लहान मुलाचं गाणं ऐकत त्याचं कौतुकही केलं. भारतीय वंशाच्या ह्या मुलाने देशभक्तीपर गीत गायलं. तो गाणं गात असताना पंतप्रधान मोदींनी चुटकी वाजवत त्याला साथही दिली.

त्याचं गाणं पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याच्या गालावरून आणि डोक्यावरून हात फिरवत त्याचं कौतुक केलं आणि त्याला आशीर्वादही दिले. पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांना भेट देणार आहेत. रशिया युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावावर ते चर्चा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gazette: मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठा पुरावा! कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी अन् मराठ्यांची 'अशी' नोंद

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारामागील खरा सूत्रधार कोण? प्रसिद्ध रॅपर आणि राजकीय नेत्याचं नाव समोर, हा नेमका आहे तरी कोण?

MS Dhoni करतोय बॉलीवूड पदार्पण? माधवनसोबतचा जबरदस्त ऍक्शन पॅक टीझर आला समोर

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रात कुणावरही अन्याय होणार नाही- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT