युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध म्हणून रविवारी रशियाच्या दूतावासाबाहेर स्वतःचा पासपोर्ट जाळताना रशियाचा नागरिक.
युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध म्हणून रविवारी रशियाच्या दूतावासाबाहेर स्वतःचा पासपोर्ट जाळताना रशियाचा नागरिक. Sakal
ग्लोबल

अधिक विनाशकारी शस्त्रांचा वापर शक्य

सकाळ वृत्तसेवा

किव्ह - युक्रेनच्या पूर्व भागावर संपूर्ण ताबा मिळविण्यासाठी रशिया धडपडत असून त्यासाठी ते आता मोठा संहार घडवून आणू शकणाऱ्या अधिक घातक शस्त्रांचा वापर करण्याचा विचार करत आहेत, असा आरोप युक्रेन आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी आज केला. या तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांची मोठी जीवित आणि वित्त हानी झाली असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

युक्रेन युद्धाचा आजचा १०९ वा दिवस होता. युक्रेनमधील दोन्बास या पूर्व भागावर रशियाने लक्ष केंद्रीत केले असून सुमारे ९० टक्के भाग त्यांच्या ताब्यात आला आहे. मात्र, युक्रेनी सैनिकांच्या तिखट प्रतिकारामुळे संपूर्ण भागावर त्यांना नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे, साठच्या दशकात वापरलेली जहाजविरोधी क्षेपणास्त्रे विमानांद्वारे या भागात टाकण्याचा विचार रशिया करत असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाचे ‘केएच-२२’ हे क्षेपणास्त्र विमानवाहू जहाजे उद्ध्वस्त करण्यासाठी विकसीत केले गेले आहे.

मात्र, या क्षेपणास्त्रांचा जमिनीवर वापर केल्यास त्यांचा मारा सहसा अचूक नसतो आणि त्यामुळे मोठी हानी होऊ शकते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाकडील अचूक मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे संपत आली असल्याने ही जुने तंत्रज्ञान असलेली क्षेपणास्त्रे वापरण्याचा त्यांचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. युद्धामध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा वापर केला आहे. त्यामुळे या देशांचे शस्त्रसाठे आटले असून आणि तिजोऱ्या बऱ्यापैकी रिकाम्या झाल्या आहेत. दोन्ही बाजूंचे हजारो सैनिकही मारले गेले आहेत.

हे युद्ध किती काळ चालेल, हे सांगता येत नाही. मात्र, आमच्या सैन्याने रशियन सैन्याला तीव्र प्रतिकार करत सर्वांचे अंदाज वारंवार फोल ठरविले आहेत. काही दिवसांतच संपूर्ण युक्रेनचा ताबा मिळविण्याच्या ऐटीत आक्रमण केलेल्या रशियाला तीन महिने उलटून गेले तरी यश आलेले नाही.

- व्होलोदोमिर झेलेन्स्की, युक्रेनचे अध्यक्ष.

रसायन प्रकल्पाला आग

रशियाच्या बाँबवर्षावामुळे सिव्हिरोदोनेत्स्क शहरातील रसायनेनिर्मिती प्रकल्पाला आग लागली असून हजारो टन तेलही लीक सांडले आहे. याच प्रकल्पाखालील भुयारांमध्ये सुमारे ८०० नागरिक रशियाच्या बाँबवर्षावापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लपलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT