Joe Biden 
ग्लोबल

Joe Biden : बायडेन यांनी निवडणुकीत कायम राहावे;कुटुंब व पक्ष सहकाऱ्यांचा आग्रह,खुल्या चर्चेनंतर पाठबळ

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अटलांटा येथे झालेल्या खुल्या चर्चेत अत्यंत खराब कामगिरी केलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना शर्यतीत माघार घेण्याचे आवाहन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पक्ष नेत्यांनी मात्र पाठबळ दिले आहे.

प्रशांत पाटील

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अटलांटा येथे झालेल्या खुल्या चर्चेत अत्यंत खराब कामगिरी केलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना शर्यतीत माघार घेण्याचे आवाहन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पक्ष नेत्यांनी मात्र पाठबळ दिले आहे. माघार घेण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत निवडणुकीत जोमाने प्रचार करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

बायडेन आणि ट्रम्प या दोघांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या खुल्या चर्चेवेळी बायडेन यांचा आवाज खोल गेल्याचे आणि काही उत्तरे असंबद्ध असल्याचे दिसून आले होते. बायडेन हे सध्या ८१ वर्षांचे असून चार वर्षांपूर्वी ते निवडून आले होते, तेव्हाच अमेरिकेचे सर्वाधिक वय असलेले अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली होती.

यावेळीही डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील ‘सीबएस न्यूज’ने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नोंदणीकृत उमेदवारांपैकी ७२ टक्के जणांना, बायडेन हे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे वाटते. निम्म्या जणांनी तर त्यांना शर्यतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

बायडेन यांनी रविवारचा दिवस त्यांच्या कुटुंबाबरोबर घालवला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पाठबळ देत त्यांना शर्यतीत कायम राहण्याचा सल्ला दिला. असे ‘फर्स्ट लेडी’ जिल बायडेन यांनी एका नियतकालिकाशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT