ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेत पुन्हा निर्बंध कडक; रुग्णालयात बेड पडू लागले अपुरे

विनायक होगाडे

जोहान्सबर्ग : कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे दक्षिण आफ्रिकेने मद्यविक्री आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याची निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी काल रात्री कडक निर्बंधाविषयीचे निर्णय जाहीर केले. या निर्बंधामागे डेल्टा विषाणू कारणीभूत असल्याचे रामफोसा यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत रविवारी चोवीस तासात नव्याने १५ हजार रुग्ण आढळून आले तर १२२ जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या प्रसारामुळे दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णसंख्या वाढू लागल्याने अनेक रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी वाट पाहवी लागत आहे. झिम्बाब्वे, नामीबिया आणि मोझँबिक देशातही रुग्ण संख्या गतीने वाढत आहे. काल रात्री बोलताना रामफोसा म्हणाले की, देशात तिसऱ्या लाटेला देखील वेग येत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध आणले जात असून येत्या दोन आठवड्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी राहणार आहे. केवळ अंत्यसंस्काराला परवानगी असेल आणि त्यात ५० पेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही. नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशात लसीकरण मोहिमेला वेग येत असून देशात कालपर्यंत २७ लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याचे ते म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेतील १२ लाख ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ९,५०,००० पेक्षा अधिकांचे लसीकरण झाले आहे. जॉन्सन ॲड जॉन्सन आणि फायझरच्या लशीची मागणी वाढवली आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत सहा कोटी नागरिकांपैकी ६७ टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय दक्षिण आफ्रिका सरकारने ठेवल्याचे रामफोसा म्हणाले. आर्थिक केंद्र असलेल्या ग्वाटेंग प्रांतात अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. कारण या प्रांतात ६० टक्क्यांहून अधिक बाधित आहेत. प्रांतात प्रवास करण्यासही मनाई करण्यात आली आहे. देशात लागू केलेल्या निर्बंधाचा चौदा दिवसांनंतर आढावा घेतला जाईल. त्यावेळची स्थिती पाहून त्यात बदल केले जातील किंवा कायम ठेवण्यात येईल, असे रामफोसा म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेतील नवीन निर्बंध

  • देशभरात रात्री नऊ ते पहाटे चारपर्यंत संचारबंदी

  • मद्यविक्रीला पूर्णपणे मनाई

  • रेस्टॉरंटला खाद्य विक्रीला परवानगी, केवळ होमडिलिव्हरीची मुभा

  • शैक्षणिक संस्था शुक्रवारपासून बंद राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT