richard thalar
richard thalar 
ग्लोबल

नोटाबंदी 'चांगली', पण...: नोबेल विजेते रिचर्ड थॅरल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटी यांसारख्या निर्णयांमुळे मोदी सरकारवर विविध स्तरातून टीका केली जात आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड थॅरल यांनी नोटाबंदीबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "भारत सरकारने जुन्या चलनी नोटा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो 'चांगला' होता. मात्र, त्याची अंमलबजावणी 'पूर्ण अयोग्य' होती''.

''पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करुन त्याऐवजी दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा पुन्हा मुद्रित करण्यात आल्या. त्यामुळे हे सारे 'गोंधळात' पाडणारे होते. नोटाबंदीचा हेतू हा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि भारतातील व्यवहार 'लेसकॅश' करणे, हा होता'', असे थॅलेर पुढे म्हणाले. 

शिकागो विश्वविद्यालयाचे प्राध्यापक स्वराज कुमार यांच्या विद्यार्थ्याने याबाबतची माहिती दिल्याने हे सर्व समोर आले आहे.

स्वराज कुमारने थॅरल यांच्यासोबत ई-मेलद्वारे झालेले संभाषण ट्विटरवरुन प्रसिद्ध केल्यानंतर हे समजले. नोटाबंदीची संकल्पना चांगली होती. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॅशलेस व्यवहार ही एक उत्तम संकल्पना होती. मात्र, ती अयोग्य प्रकारे गुंडाळण्यात आली. तसेच 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा सादर केल्याने गोंधळात भर पडली, असे ट्विट थॅरल यांनी केले होते.

तसेच कॅशलेसच्या दृष्टीने आणि भ्रष्टाचार रोखण्याच्या दृष्टीने उचलले गेलेले हे एक चांगले पाऊल असल्याचेही थॅरल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT