United Nations sakal
ग्लोबल

Russia-Ukraine : स्थलांतरितांची संख्या १० लाखांवर

अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा

किव्ह: रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर एकाच आठवड्यात सुमारे दहा लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाने आज याबाबतची आकडेवारी जाहीर केली. रशियाने तीन बाजूंनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक नागरिक जीवाच्या भयाने देश सोडून गेले आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवारी झालेल्या आक्रमणानंतर युक्रेनच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन टक्के नागरिकांनी देशाबाहेर आश्रय घेतला असल्याचे ‘यूएन’ने सांगितले. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने तुफान हल्ले सुरु ठेवले असल्याने या शहरातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हजारो नागरिक मिळेल त्या रेल्वेने शहर सोडत आहेत. किव्ह शहरात रोजच रशियन रणगाडे बाँबफेक करत आहेत. क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत.

रशियाच्या सैन्याचे हाल

युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगाने रशियाला एकटे पाडल्याने या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत अडचणीत आल्याचे चित्र आहे. रशियाची बाहेरील देशांमधील संपत्ती गोठविण्यात आली असून आंतरराष्ट्रीय व्यवहारही बंद केले असल्याने त्यांच्याकडे युद्ध सुरु ठेवण्यासाठी पैसेच नसल्याचा अर्थतज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळेच युक्रेनमध्ये लढणाऱ्या सैन्याला अन्नाची आणि इंधनाची कमतरता भासत आहे. त्यामुळे किव्ह शहराचा पाडाव करण्यासाठी निघालेले रशियाचे शेकडो रणगाडे इंधनाविना शहराच्या वेशीवरच थांबून राहिले आहेत. रशियाचे सैनिकही युक्रेनच्या ताब्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आज झालेल्या संघर्षात रशियाच्या सैन्यातील मेजर जनरल पदावरील अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT