Volodymyr Zelensky y- Vladimir Putin esakal
ग्लोबल

रशियाला सांगा, युद्ध थांबवा; युक्रेन आंतरराष्ट्रीय न्यायालयात

नेदरलँडमध्ये स्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरु झाली.

सकाळ वृत्तसेवा

हेग : युक्रेनमध्ये विनाशकारी युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबविण्याचे आदेश रशियाला तातडीने द्यावे, अशी विनवणी युक्रेनने आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली. रशियाने मात्र या खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहून या सुनावणीला महत्त्व देणार नसल्याचे सूचित केले.

नेदरलँडमध्ये स्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरु झाली. या न्यायालयात आपली बाजू मांडताना युक्रेनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, रशियाला रोखणे आवश्यक असून आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणी हस्तक्षेप करू शकते. त्यामुळे युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबविण्याचे आदेश रशियाला तातडीने दिले जावेत आणि त्यांना सामान्य नागरिकांवर अत्याचार केल्याबद्दल शासन करावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे.

युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रदेशांमध्ये युक्रेन सरकारने वंशच्छेद करण्याचा प्रयत्न केल्याचा रशियाचा आरोप आहे. मात्र, रशियाचा हा आरोप चुकीचा असल्याचा दावा युक्रेनच्या प्रतिनिधीने केला आहे. ‘आपला आरोप सिद्ध करण्यास रशियाचा कोणताही प्रतिनिधी येथे हजर नाही. कारण ते खोटे बोलत आहेत. आपले म्हणणे मांडण्याऐवजी ते आमच्या देशाविरुद्ध युद्ध करत असून त्यात सामान्य नागरिकांचा जीव जात आहे,’ असे या प्रतिनिधीने सांगितले. या खटल्याबाबत न्यायालयाचा निकाल लवकरच येणे अपेक्षित आहे.

अंमलबजावणीची शक्यता कमी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला युद्ध थांबविण्याचा आदेश दिला तरी या आदेशाची अंमलबजावणी होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. एखाद्या देशाला दिलेला आदेश त्या देशाने पाळण्यास नकार दिल्यास, त्यांना तो पाळायला लावण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीला देऊ शकते. मात्र, या सुरक्षा समितीच्या पाच कायमस्वरुपी सदस्यांमध्ये रशियाचा समावेश असल्याने स्वत:विरोधातील आदेशाविरोधात रशिया व्हेटो अधिकावर वापरू शकते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याची शक्यता नसल्याचे जाणकार सांगतात. मात्र, तरीही रशियाविरोधात निकाल लागल्यास त्यांच्यावरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT