russia ukraine war updates Rostov military hq captured by wagner group rebellion russia mutiny vladimir putin  
ग्लोबल

Russia Civil War : वॅगनर ग्रुपने घेतला रशियन लष्करी मुख्यालयाचा ताबा; मॉस्कोकडे करणार कूच

रोहित कणसे

रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियासमोर वेगळच संकट उभं ठाकलं आहे. वॅगनर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन ने देशातील अनेक शहरांवर ताबा मिळवाला आहे. यादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी वॅगनर ग्रुपला निर्वाणीचा इशाराही देखील दिला आहे.

वॅगनर गटाच्या बंडानंतर रशियामध्ये परिस्थिती अनियंत्रित आहे. वॅगनरचे चीफ ऑफ स्टाफ, येवगेनी प्रिगोझिन यांनी दावा केला की त्यांच्या सैनिकांनी रोस्तोवमधील रशियन सैन्याच्या दक्षिणेकडील लष्करी मुख्यालयावर कब्जा केला आहे. प्रीगोझिनने स्वत: रोस्तोव्हमधील रशियन सैन्याच्या मुख्यालयात असल्याचा दावा देखील केला आहे.

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बंडखोरांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी दिली आहे. यादरम्यान रशियन सैन्याने मॉस्कोसह अनेक मोठ्या शहरांची सुरक्षा वाढवली आहे.

पुतिन यांनी वॅगनरला दिली धमकी

रशियन नागरिक, लष्करी आणि सुरक्षा संस्थांना संबोधित करताना पुतिन म्हणाले की, रशियन अधिकारी रशियामध्ये पुन्हा विभाजन होऊ देणार नाहीत, लोकांचे संरक्षण केले जाईल. त्यांनी रात्री सर्व दिशांच्या लष्करी कमांडर्सशी बोलताना सांगितले, सैन्य शौर्याने लढत आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या विशेष लष्करी कारवाईदरम्यान कोणत्याही संघर्षापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

त्यांनी वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांना लक्ष्य केले. पुतिन यांनी अति महत्वाकांक्षेमुळे रशियाविरुद्ध देशद्रोह झाल्याचा आरोप प्रिगोझिन यांच्यावर केला. पुतिन यांनी स्पष्टपणे सांगितले की उठावाच्या प्रयत्नासाठी जबाबदार असलेल्या सर्वांनी शिक्षा भेगावी लागेल तसेच कायदा आणि लोकांना उत्तर द्यावे लागेल.

रशियन सैन्याचे मुख्यालय घेतलं ताब्यात

वॅगनर प्रमुख प्रिगोझिन यांनी दक्षिणेकडील रशियन शहर रोस्तोव-ऑन-डॉनमध्ये असलेल्या रशियन सैन्याच्या मुख्यालयात असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या सैनिकांनी शहरातील लष्करी ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. तसेच प्रीगोझिनने टेलिग्रामवरील व्हिडिओमध्ये म्हटले की, रोस्तोवमधील विमानतळासह अनेक लष्करी ठिकाणे आमच्या नियंत्रणाखाली आहेत. दरम्यान, मध्य रशियातील लिपेत्स्क प्रदेशाच्या गव्हर्नरने मॉस्कोला दक्षिणेकडील प्रदेशांशी जोडणारा M-4 मोटरवे वाहतुकीसाठी बंद केला आहे.

तसेच प्रिगोझिन यांनी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि रशियाचे सर्वोच्च जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी दक्षिणेकडील रोस्तोव-ऑन-डॉन शहरात भेट देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, प्रीगोझिन म्हणाले की तो सध्या दक्षिणी लष्कराच्या मुख्यालयात आहेत, जो रोस्तोव-ऑन-डॉन येथे आहे. ते म्हणाले की आम्ही येथे आलो आहोत, आम्हाला चीफ ऑफ द जनरल स्टाफ आणि शोईगु यांचे स्वागत करायचे आहे. ते येईपर्यंत आम्ही इथेच राहू, आम्ही रोस्तोव्ह शहराची नाकेबंदी करू आणि मॉस्कोवर कूच करू.

पुतीन यांचा इशारा

पुतीन यांनी या सशस्त्र उठावाला देशद्रोह म्हटले आहे. वॅगनरने जो आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल. रशियाच्या रक्षणासाठी जे करता येईल, ते मी करेल. तसेच, रोस्तोव-ऑन-डॉन शहरातील परिस्थिती सांभाळण्यासाठी निर्णायक कारवाई करण्यात येईल, असंही पुतीन यावेळी म्हणाले. वॅगनर सेनेचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याने हे शहर आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.

यावेळी देशाला संबोधित करताना पुतीन म्हणाले, की रशिया सध्या आपल्या भविष्यासाठी सगळ्यात कठीण लढाई लढत आहे. देशात भाऊ-भावाविरुद्ध उभा राहत आहे. यासाठी वॅगनर सेनेने केलेला विश्वासघात कारणीभूत असून, त्यांना आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असं पुतीन यावेळी म्हणाले.

काय आहे प्रकरण?

वॅगनर ग्रुप हा एक भाडोत्री सैनिकांचा गट असून या गटाने रशियाविरोधात बंड केलं आहे. पूर्वी रशियासाठी लढत असलेले हे सैनिक आता रशियाविरोधात लढत आहेत. या ग्रुपने रशियाविरुद्ध सशस्त्र उठाव केल्याने पुतिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत . त्यामुळे रशियामध्ये मोठं अंतर्गत युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT