Vladimir Putin
Vladimir Putin esakal
ग्लोबल

Vladimir Putin: तिसरं महायुद्ध होणार? पुतिन यांच्या सत्तेत येण्यामुळे जगावर होणारे 3 परिणाम!

कार्तिक पुजारी

मॉस्को- रशियातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे व्लादिमीर पुतिन यांचा विजय झाला आहे. त्यांना एकूण मतांच्या तब्बल ८८ टक्के मतं मिळाली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, जोसेफ स्टॅलिननंतर गेल्या २०० वर्षातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे ते नेते ठरले आहेत. पुतिन गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत आहेत. ७१ वर्षीय पुतिन यांनी आजन्म सत्तेत राहण्याची तरतूद केली आहे. तुर्तास ते सहा वर्षांसाठी अध्यक्षपदी राहणार आहेत. (Russia Vladimir putin Landslide Win will reason for world war 3 effects on world)

रशियामधील अध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ औपचारिक होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, पुतिन यांच्या विरोधात कोणताही सक्षम प्रतिस्पर्धी उभा नव्हता. पुतिन यांचे विरोधक एकतर परदेशात पळून गेलेत किंवा त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. पुतिन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे अॅलेक्सी नवाल्गी यांचा काही दिवसांपूर्वी रशियाच्या दुर्गम भागातील एका तुरुंगामध्ये गूढ मृत्यू झाला होता. त्यामुळे पुतिन यांचे विरोधक एकतर देश सोडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो असं चित्र आहे.

निवडणुकीतील विजयानंतर पुतिन यांनी युक्रेनबाबत बोलताना तिसऱ्या महायुद्धाची भाषा केली आहे. यापार्श्वभूमीवर, पुतिन यांच्या पुन्हा सत्तेत येण्याने जगावर काय परिणाम होतील? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक प्राध्यापक रोहन चौधरी यांनी तीन महत्त्वाच्या परिणामांचा उल्लेख केला आहे. रोहन चौधरी म्हणाले की,

1) पुतिन हे राष्ट्रवादाचे प्रतिक आहेत. त्यांच्या पुन्हा सत्तेत येण्यामुळे जगभरातील राष्ट्रवादी शक्तींना अधिक चेव येईल. जगात आज जी काही अशांतता निर्माण झाली आहे, ती येत्या काळात शमणार नाही. पुतिन यांच्या सत्तेत राहिल्याने अंशाततावादी तत्त्वांना अधिक बळ मिळेल. त्याचे परिणाम जागतिक राजकारणावर पाहायला मिळतील.

2) पुतिन यांचे पुन्हा अध्यक्ष होणे हे लोकशाहीसमोरील आव्हान ठरणार आहे. कारण, पुतिन यांच्या दाव्यानुसार, देशातील जनता त्यांच्याच पाठिशी उभी आहे. त्यामुळे त्यांना भरभरुन मतं देण्यात आली आहेत. पुतिन हे मतपेढीतून सत्तेत येणे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. रशियात निवडणुका पार पडल्या, पण प्रबळ प्रतिस्पर्धी नाही, विरोधीपक्ष नाही. विरोधकांना डोकं वर काढायला कोणतीच संधी नाही. त्यामुळे रशियातच्या निवडणुका एक प्रकारची थट्टाच आहे. चीन देखील असाच कित्ता गिरवत आहेत. स्वत:ला लोकशाही देश म्हणवून घेणाऱ्या देशांमध्ये अशी स्थिती निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.

3) गेल्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. युक्रेन युद्धाने रशियाला चांगलेच थकवले आहे. पण, आता युक्रेनला देखील पश्चिमी देशांची मदत कमी होऊ लागली आहे. पुतिन यांनी अध्यक्षपदावार पुन्हा ठाण मांडली असल्याने ते युक्रेनबाबत अधिक आक्रमक होतील. २०१४ मध्ये रशियाने जसा क्रिमियाचा घास गिळला, तसाच युक्रेन पूर्ण ताब्यात घेण्यासाठी पुतिन जोर लावू शकतात. अशावेळी अमेरिका आणि यूरोपीय देश गप्प बसणार नाहीत आणि एका मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकते. रशियाला चीन आणि इराण सारख्या देशांची साथ मिळाल्यास पुतिन यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर तिसऱ्या महायुद्दाला देखील तोंड फुटू शकतं.

भारतावर काय होणार परिणाम?

रशियाचे पुतिन हे भारताचे मित्र आहेत. त्यांच्या पुन्हा सत्तेत येण्यामुळे भारताचा एकप्रकारे फायदाच होईल. पण, यासंदर्भात जास्त काही प्रभाव पडणार नाही. भारत आणि रशियामध्ये जे धोरण होतं तेच पुढे चालणार आहे. मात्र, रशियाने युक्रेनबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याचं भारत काय भूमिका घेईल याकडे सर्व जगाचं लक्ष असेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT