PM Modi Intervention
PM Modi Interventionesakal

PM Modi : पुतिन करणार होते युक्रेनवर अणुबॉम्ब हल्ला, पण मोदींच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला; US रिपोर्टमध्ये दावा

PM Modi Intervention : रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही संघर्ष सुरुच आहे. आता युद्धाच्या संबंधाने एक विशेष माहिती पुढे आलेली आहे. ज्यामध्ये म्हटलंय की, २०२२ वर्षाच्या शेवटाला रशिया युक्रेनवर आण्विक हल्ल्याची तयारी करत होता. हा हल्ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती.

PM Modi Intervention : रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही संघर्ष सुरुच आहे. आता युद्धाच्या संबंधाने एक विशेष माहिती पुढे आलेली आहे. ज्यामध्ये म्हटलंय की, २०२२ वर्षाच्या शेवटाला रशिया युक्रेनवर आण्विक हल्ल्याची तयारी करत होता. हा हल्ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती.

'सीएनएन'ने रविवारी एक रिपोर्ट पब्लिश केला आहे. ज्यामध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा केलाय की, २०२२ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही देशांच्या नेत्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करुन युक्रेनमध्ये आण्विक हल्ला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला.

PM Modi Intervention
Oscar Winner 2024 : अँड द ऑस्कर गोज टू…सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर एम्मा स्टोन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांचं प्रशासन रशिया-युक्रेन युद्धामुळे त्रस्त होतं. रशियाकडून सामरिक किंवा अण्वस्त्राचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर देशांच्या नेत्यांशी संपर्क केला. त्यामुळे हे भीषण संकट टळलं.

रिपोर्टनुसार, रशियाच्या या निर्णयाची माहिती २०२२च्या शेवटी कळली होती. जेव्हा युक्रेनी सेना दक्षिण रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातून पुढे-पुढे जात होती आणि त्यांनी रशियाच्या सैन्याला घेरलं होतं. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी चिंतीत होते. अशा स्थितीत आण्विक हल्ला होऊ शकतो, असा संशय व्यक्त होत होता.

PM Modi Intervention
Nandini Rajbhar: एसबीएसपीच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर यांची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

त्यानंतर अमेरिकेने भारतासह इतर देशांकडून मदत मागितली. त्यामुळे चीन, भारत आणि इतरांनी रशियाशी संपर्क केला आणि दबाव वाढवला. त्यामुळे रशियाला नमतं घ्यावं लागलं होतं. त्यात रशिया-युक्रेन प्रकरणात भारताने नेहमीच युद्धादरम्यान झालेल्या हत्यांचा निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी उज्बेकिस्तानमधील एससीओ शिखर संमेलनात पुतिन यांना उद्देशून म्हटलं होतं की, हा काळ युद्धाचा नाही. भारताच्या या भूमिकेमुळे जगभरात कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com