Ebrahim Raisi  
ग्लोबल

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांचे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडले, स्थिती बिकट असल्याची माहिती

President Ebrahim Raisi News:इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी हे ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते ते सापडले आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी हे ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते ते सापडले आहे. बचाव पथक हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. एकंदरीत परिस्थिती बिकट असल्याची पाहिती बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. वातावरण प्रतिकूल असल्याने रईसी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बचावपथकाला अडथळा येत होता.

इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर सापडले आहे. पण, त्याची स्थिती वाईट असल्याची माहिती देण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये अध्यक्ष रईसी, परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अबदोल्लाहिन आणि इतर काही अधिकारी होते. त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा दलाकडून तात्काळ शोध मोहीम सुरु करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत रईसी यांनी एका धरणाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर ते परत निघाले होते. बचावपथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'आम्हाला हेलिकॉप्टर सापडले आहे. आम्ही त्यादिशेने जात आहोत. पण, एकूण स्थिती वाईट दिसत आहे.' यासंदर्भातील एक फोटो समोर आला आहे. यात हेलिकॉप्टर वाईटरीत्या दुर्घटनाग्रस्त झाल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT