Coronavirus-Vaccine 
ग्लोबल

लस येईलच असे नाही! तज्ज्ञांचा गंभीर इशारा, जगाची चिंता वाढली

वृत्तसंस्था

लंडन - जगभरात अनेक देशात कोरोनाच्या विषाणूविरोधात लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. यातील काही चाचण्या अंतिम टप्प्यावर आल्याचा दावाही करण्यात येत आहे; मात्र असे असले तरी कोरोनावरची लस प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

एचआयव्हीवर लस नाही 
कोरोना महामारीने आतापर्यंत जगभरात अडीच लाख नागरिकांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन उठवण्यासही अनेक देश कचरत आहेत. कोरोनावरची लस येईपर्यंत स्थिती पूर्वपदावर येणार नाही, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. एचआयव्ही, डेंगी प्रमाणे कोरोनावरही कदाचीत लस शोधण्यात अपयश येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

डेंगीवरही औषध नाही 
काही देशांनी डेंगीसाठी प्रतिबंधात्मक लस शोधून काढल्याचा दावा केला आहे. केवळ डेंगीचे निदान झालेल्या व्यक्तींसाठीच ही लस सुरक्षित असून इतरांसाठी ती अपयकारक ठरत असल्याचे डब्लूएचओचे म्हणणे आहे.

जगभरात काही साथरोगांवर प्रतिबंधात्मक लस शोधण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. कोरोनावर लस आली तरी सुरक्षितता आणि परिणामकारकता या कसोटीवर ती खरी उतरेल का? हा प्रश्नच आहे. सर्दी, खोकला, तापाकडे दुर्लक्ष करण्याची संस्कृती हद्दपार करावी लागणार आहे.
- डॉ. डेव्हिड नाबारो, डब्लूएचओचे कोविड-१९ विशेष दूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Banana Market: केळीच्या दरात घसरण; २६ रुपये किलोचा दर ३ रुपयांवर, निर्यातदारांची बागांकडे पाठ; साेलापुरातील उत्पादकांचे हाल

उमेश कामत पहिल्यांदाच दिसणार डॉक्टरच्या भूमिकेत ! ताठ कणा सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Latest Marathi Breaking News Live: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली व कोल्हापूर ऊस दरावरून कार्यकर्त्यांची धरपकड

Solapur Crime: 'साेलापुरात फोटो व्हायरलची धमकी देऊन विनयभंग'; पाच संशयित आरोपींविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Buldhana Accident: जामसावळीला जाणाऱ्या दोन भाविकांचा अपघाती मृत्यू; केळवदनजीक ट्रकने दिली दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT