Sierra Leone Zombie Drug eSakal
ग्लोबल

Zombie Drug : झॉम्बी ड्रगचा कहर, थडग्यांमधून मृतदेहांची होतेय चोरी.. आफ्रिकेतील देशामध्ये आणीबाणी जाहीर!

Kush Drug : सिएरा लिओनचे राष्ट्रपती ज्युलियस माडा बियो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रगचं नाव कुश असं आहे.

Sudesh

Sierra Leone Zombie Drug : दक्षिण आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. याला कारण म्हणजे 'झॉम्बी ड्रग' बनवण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतदेहांची चोरी केली जात आहे. यासाठी कित्येक ठिकाणी थडग्यांना उकरलं जात असल्याचंही समोर आलं आहे. (National Emergency)

सिएरा लिओनचे राष्ट्रपती ज्युलियस माडा बियो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रगचं नाव कुश (Kush) असं आहे. देशातील कित्येक नागरिकांना या ड्रगचं व्यसन लागलं आहे. विशेष म्हणजे देशातील रुग्णालयांमध्ये असणारे 63 टक्के रुग्ण हे याच ड्रगचे व्यसनी आहेत; असंही बियो यांनी सांगितलं.

मृतदेहाच्या हाडांचा वापर

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 'कुश' ड्रग्स (Kush Drugs) बनवण्यासाठी विविध पदार्थांचा वापर होतो. मात्र यातील मुख्य घटक हा चक्क मानवी हाडं आहेत. यामुळे हे ड्रग्ज बनवणारे लोक थडग्यांना उकरुन मृतदेहांची चोरी करत आहेत. यामुळे देशातील कित्येक दफनभूमींबाहेर पोलिसांचा पहारा ठेवावा लागत आहे.

हा अमली पदार्थ सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा समोर आला होता. याचं सेवन करणारी व्यक्ती कित्येक तास नशेत राहते. मात्र यामुळे शरीराला सूज येण्यासह कित्येक दुष्परिणाम दिसून येतात. हे ड्रग आता सिएरा लिओनसाठी मोठी समस्या ठरत आहे. ड्रग बनवणाऱ्या कित्येक टोळ्यांनी आतापर्यंत हजारो थडग्यांमधून मृतदेह आणि सापळ्यांची चोरी केली आहे.

4000 टक्क्यांनी वाढले रुग्ण

सिएरा लिओन सायकॅट्रिक रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अब्दुल जल्लोह यांनी आणीबाणीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या ड्रगला लढा देण्यासाठी हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये या ड्रगचं सेवन करणाऱ्या कित्येक तरुणांचं ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं आहे. 2020 ते 2023 या काळात कुश संदर्भातील आजारांची लागण झालेल्या रुग्णांचं प्रमाण 4,000 टक्क्यांनी वाढलं आहे.

देशाच्या अस्तित्वासाठी लढाई

राष्ट्रपती ज्युलिअस यांनी कुश ड्रग्सविरोधातील लढाई ही देशाच्या अस्तित्वासाठी असणारी लढाई आहे असं म्हटलंय. या अमली पदार्थामुळे देशाचा मृत्यूदर वाढला आहे. याला लढा देण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तसंच, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीडितांसाठी देखभाल आणि मदत केंद्र तयार केलं जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT