Katie with children
Katie with children 
ग्लोबल

दत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ!

वृत्तसंस्था

न्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना चित्रपटातील नव्हे तर खऱया खुऱया आयुष्यात अमेरिकन महिलेच्या बाबतीत घडली आहे.

अमेरिकेतील कोलोराडो येथे राहणाऱया कॅटी पेज या 30 वर्षीय महिलेचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर तिने घर व नोकरी बदलली आणि नवीन आयुष्याला सुरवात केली अन् तिने अनाथ मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुल दत्तक हवे असल्याबद्दल तिने अनाथलायात माहिती दिली होती.

2016 मध्ये कॅटीला एका अनाथालयातून फोन आला व खासगी रुग्णालयामध्ये चार दिवसाच्या बाळाला सोडून गेल्याची माहिती दिली. मला हे बाळ हवे आहे. मला फक्त पाच मिनिटे द्या, तोपर्यंत कोणालाही फोन करू नका म्हणून कॅटीने सांगितले, अशी माहिती लव्हव्हॉटमॅटर्स नावाच्या पेजवर ब्लॉगमध्ये दिली आहे.

कॅटीने तत्काळ रुग्णालय गाठले. बाळाला पाहताच ती प्रेमात पडली. व बाळ दत्तक घेतले. पुढे कॅटी या बाळाच्या खऱ्या आई-वडिलांची बरेच दिवस वाट पाहिली. पण कुणी आले नाही. कॅटीने न्यायालयाकडून बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि बाळाचे नाव ग्रेसन असे ठेवले. ग्रेसनचा अकरा महिने प्रेमाने सांभाळ केला. दरम्यानच्या काळात न्यायालयाची प्रक्रियाही पुर्ण झाली होती.

दोन आठवड्यांनी पुन्हा कॅटीला एक फोन आला. ग्रेसनला ज्या रुग्णालयात सोडण्यात आले होते त्याच रुग्णालयात एका मुलीला कोणतीही सोडून गेले होते. फोनवरील माहिती ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आले आणि पुन्हा एकदा रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात गेल्यानंतर त्या बाळालाही दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या मुलीला घरी आणल्यानंतर तिचे नाव हनाह असे ठेवले.

दरम्यान, ग्रेसन व हनाहला कॅटीने हॉस्पिटलमध्ये काही दिवस ठेवले. त्यावेळी दोघांच्याही ब्रेसलेटवरील नावात एक साम्य होते. ते म्हणजे दोघांचीही आई एकच असल्याचे समोर आले. यामुळे कॅटीची उत्सुकता वाढली. तिने या मुलांच्या खऱया आईचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. कॅटीच्या शोधाला यश आले आणि त्या बाळांच्या खऱया आईशी भेट घडवून आणली. यावर माझाच विश्वास बसत नाही, असे कॅटीने म्हटले आहे. परंतु, हे खरोखर घडले असून, तिने याबाबतची माहिती ब्लॉगवर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT